Honey Trap News : पोलिस मित्राने रचलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये अभियंता अडकला; अन्...

Gadchiroli Police : पोलिस अन् पत्रकाराने संगनमत करून मागितली दहा लाखांची खंडणी
Honey Trap
Honey TrapSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli Crime News : गडचिरोलीतील एक शासकीय अभियंता कामानिमित्त नागपूरला गेले असता पोलिस आणि पत्रकाराने रचलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये अलगद अडकले. दहा लाखांची खंडणी मागितल्यानंतर अभियंत्याने गडचिरोली पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी तपास करून पोलिसांनी मित्र असलेल्या पोलिसासह पत्रकार आणि एका महिलेस अटक केली आहे. या प्रकाराने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुनील गवई (पोलिस), रविकांत कांबळे (पत्रकार), रोहित अहिर व ईशानी यांना ताब्यात घेतले आहे. यातील एक महिला फरार असून तिचा शोध सुरू आहे. गडचिरोली पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा 'हनी ट्रॅप'चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Honey Trap
Nashik Politics : आघाडीची गाडी नाशिकमध्ये अडलेलीच तर; दिंडोरीत सापडेना पर्याय

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अभियंता नागपुरात (Nagpur) गेल्यानंतर पोलिस असलेल्या सुशील गवई याने त्यांच्यासाठी हॉटेलमधील एक रुम बूक केली होती. त्या खोलीत दोन महिलाही थांबल्या होत्या. मात्र सकाळ होताच महिलांनी अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला. प्रकरणातून वाचवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकीही दिली. याचवेळी अभियंत्याचा मित्र असलेल्या गवई यांनी या प्रकरणात रविकांत कांबळे याला दोन ते तीन लाख रूपये दिल्याचे नाटक केले.

Honey Trap
Advocate Couple Death : वकील आढाव दाम्पत्य हत्याकांड, न्यायालयीन कामकाज बंद; नगरमध्ये वातावरण तापले

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींनी काही दिवसांनतर तुम्ही बलात्कार केल्यामुळे महिला ही गर्भवती असल्याचे सांगितले. सोबतच बलात्काराचा गुन्हा दाखल करून सार्वजनिक बदनामी करण्याची धमकी दिली. हे संपूर्ण प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी अभियंत्याकडून दहा लाख रुपयांची मागणी केली. अचानकपणे घडलेल्या या घटनाक्रमाने संबंधित अभियंता हा पुरता घाबरला. त्यांनी मात्र हिमंत दाखवत झालेल्या या प्रकाराची गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांत तक्रार दाखल केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोली जिल्हा पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. यांनतर तातडीने नागपुरात एक पथक रवाना झाले. त्यांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने गोपनीय माहिती जमा केली. वरील आरोपींना पोलिसांनी अटक केली. 'हनी ट्रॅप'च्या या घटनेने आता प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Honey Trap
Teachers Transfer : नगरमधील 118 गुरुजी कायद्याच्या कचाट्यात! काय आहे प्रकरण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com