Ranajagjitsinha Patil Won : पराभवाच्या छायेतील राणा पाटलांनी विकासकामांच्या बळावर विजय खेचून आणला

Ranajagjitsinha Patil Won Tuljapur Constituency : परिस्थिती अत्यंत वाईट आहे, विजय अवघड आहे, हे गृहीत धरून तयारी केल्यामुळे तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना विजय मिळाला. महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाटील यांच्या पराभवसाठी कंबर कसली होती. पाटील यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.
Ranajagjitsinha Patil Won : पराभवाच्या छायेतील राणा पाटलांनी विकासकामांच्या बळावर विजय खेचून आणला
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तब्बल 52 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. महायुतीच्या उमेदवार होत्या तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील. या मताधिक्यामुळे आमदार पाटील यांना मोठा धक्का बसला होता. स्वच्छ प्रतिमा, मतदारसंघात केलेली विकासकामे, नियोजनबद्ध यंत्रणा आणि वैयक्तिक संपर्काच्या बळावर सहा महिन्यांत आमदार राणाजगतसिंह पाटील यांनी तिरंगी लढतीत बाजी मारली आहे. काँग्रेसचे कुलदीप उर्फ धीरज पाटील यांचा त्यांनी ३६,५०० मतांनी त्यांनी पराभव केला..

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शेवटच्या क्षणाला अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावरून महायुतीत नाराजीनाट्यही झाले होते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. तरीही अर्चनाताई पाटील यांचा 3 लाख 37 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे आमदार पाटील यांच्या अडचणी वाढल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

विधानसभा निवडणुकीतही सुरुवातीला या मतदारसंघात नाट्यमय घ़डामोडी घडल्या. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे काढण्यात आलेली राज्यव्यापी यात्रा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि परंडा मतदारसंघांतून गेली. त्यामुळे या दोन्ही जागा शरद पवार आपल्या पक्षाकडे घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. तुळजापूर मतदारसंघातून अशोक जगदाळे यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र जागा सुटली ती काँग्रेसलाच. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले 90 वर्षीय मधुकरराव चव्हाण हे या निवडणुकीतही इच्छुक होते.

Ranajagjitsinha Patil Won : पराभवाच्या छायेतील राणा पाटलांनी विकासकामांच्या बळावर विजय खेचून आणला
Dhananjay Munde : लाडकी बहीण योजनेबद्दल परळीत महिलांकडून धनंजय मुंडेंचा सत्कार

चव्हाण यांच्या वयाचा विचार करता त्यांना उमेदवारी मिळेल का, याबाबत साशंकता होती. ती खरी ठरली आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुलदीप उर्फ धीरज पाटील यांना उमेदवारी मिळाली. चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसेचे युवा नेते ऋषी मगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जीवनराव गोरे आणि अशोक जगदाळे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. समाजवादी पक्षाकडून तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी रिंगणात उतरले. त्यामुळे राणाजगजतिसिंह पाटील यांचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा

अर्ज मागे घ्यायच्या अंतिम दिवशी चक्रे फिरली आणि चव्हाण, गोरे, जगदाळे, मगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. शरद पवार यांनी हस्तक्षेप केल्यामुळेच हे घडल्याचे सांगितले गेले. शरद पवार यांनी मुधकरराव चव्हाण यांना फोन केला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या चव्हाण यांनी माघार घेतली. चव्हाण हे तुळजापूर मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले होते. गावागावांत त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली असती आणि आमदार पाटील यांचा मार्ग आणखी सुकर झाला असता. समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी यांची उमेदवारी कायम राहिली.

Ranajagjitsinha Patil Won : पराभवाच्या छायेतील राणा पाटलांनी विकासकामांच्या बळावर विजय खेचून आणला
Aurangabad East Assembly Result News : 'काँटे की टक्कर' पण भाजपच्या अतुल सावेंनी एमआयएमचा 'पतंग' कापलाच!

राणाजगतजिसिंह पाटील (Ranjitsingh Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून 2019 च्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 मध्ये ते तुळजापूर मतदारसंघातून विजयी झाले होते. या निवडणुकीत सुरुवातीला शरद पवार यांनी तुळजापूर मतदारसंघात लक्ष घातले नव्हते, असे चित्र दिसत होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शरद पवार सक्रिय झाल्याचे दिसून आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही आमदार पाटील यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती.

चव्हाण, गोरे, मगर, जगदाळे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने धीरज पाटील यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि आमदार पाटील यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना परिस्थिती अत्यंत वाईट आहे, असे गृहीत धरून काम करण्याची सूचना केली होती. अपक्षांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याचीही तयारी त्यांनी आधीच केली होती. येथेच लढाई त्यांच्यासाठी सोपी झाली. त्यांची प्रचारयंत्रणा अगदी शिस्तबद्ध होती. त्याद्वारे ते गावागावांत पोहोचले. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात विकासकामे, स्वच्छ प्रतिेमेच्या बळावर त्यांना यश आले आणि ते विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com