राणेंनी मातोश्रीकडे बोट दाखवू नये,शिवसेनेनेही त्यांचा जुना इतिहास उगाळू नये...

या आरोप-प्रत्यारोप आणि भांडणांमध्ये ज्या शिवसैनिकाच्या जोरावर आपण मोठे झालो तो सामान्य शिवसैनिक व त्याच्या स्वप्नांचे काय?ती कधी पूर्ण होणार? (Shivsena Maharashtra)
Mane-Rane-raut
Mane-Rane-rautSarkarnama

हिंगोली : शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांची सत्र सुरू आहे. ते कुठल्याही सामान्य शिवसैनिकांला पटण्यासारखी नाही.(Narayan Rane) यापूर्वी महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. (Shivsena) शिवसेना-भाजप भांडत आहे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस रिंगणाबाहेर राहून हा सगळा तमाशा पाहत आहेत, (Bjp)अशा शब्दात शिवसेनेचे माजी खासदार ऍड.शिवाजी माने यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. (Hingoli)

नारायण राणे यांनी मातोश्रीकडे बोट दाखवू नये आणि शिवसेनेने देखील राणे यांचा जुना इतिहास उगाळत बसू नये, असा सल्ला देखील माने यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. या व्हिडिओत माने म्हणाले, या राज्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची स्वतंत्र विचारधारा होती. आज मात्र हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सध्या जो वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ते महाराष्ट्रातील जनतेला, शिवसैनिकाला आवडलेले नाही.

हे आता कुठेतरी थांबले पाहिजे.नारायण राणे यांनी मातोश्रीकडे बोट दाखवून आरोप करणे थांबवले पाहिजे,शिवसेनेने देखील नारायण राणे कोण होते? त्यांची संपत्ती किती त्यांनी किती खून केले? हा जुना इतिहास उगाळत बसू नये. तसं पाहिलं तर शिवसेना वाढण्यामध्ये राणे यांचा मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही.

Mane-Rane-raut
शिवसेना-भाजपचे भांडण मिटवून मी त्यांना एकत्र आणणार

या आरोप-प्रत्यारोप आणि भांडणांमध्ये ज्या शिवसैनिकाच्या जोरावर आपण मोठे झालो तो सामान्य शिवसैनिक व त्याच्या स्वप्नांचे काय?ती कधी पूर्ण होणार? याचा विचार कुणीच करत नाही.शिवसेना-भाजप भांडण राष्ट्रवादी आणि काँग्रेस ते दोन पक्ष मजेने पहात आहेत.त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे मला व सामान्य शिवसैनिक, जनतेला वाटते ,असेही माने म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com