Khotkar V/S Danve News : सौर उर्जा प्रकल्प येण्याआधीच दानवे-खोतकर यांच्यात श्रेयवादाचा भडका!

Read about the ongoing fight for credit between Raosaheb Danve and Arjun Khotkar in Maharashtra politics. : अर्जून खोतकर यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला आपण मंजूरी आणि निधी आणल्याचे सिद्ध झाले नाही, तर त्यांची आयुष्यभर गुलामी करू, अशा शब्दात दानवे यांना आव्हान दिले.
Arjun Khotkar-Raosaheb Danve News
Arjun Khotkar-Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Politics : जालन्याचे माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विद्यमान आमदार अर्जून खोतकर यांच्या सध्या श्रेयवादाचा भडका उडाला आहे. जालना महानगर पालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजूरी कोणी आणली? यावरून जिल्ह्यातील या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

मी आणलेल्या योजनांचे श्रेय खोतकरांनी लाटू नये, अशा शब्दात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्यांना सुनावले. तर जे काम मी केले त्याचे श्रेय घेणारच, असे प्रत्युत्तर अर्जून खोतकर यांनी दिले आहे. रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्याचे सलग पाच टर्म खासदार होते. 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला. तर अर्जून खोतकर 2019 मध्ये पराभूत झाले होते, आता ते निवडून आले आहेत.

त्यामुळे 2022 मध्ये मंजूर झालेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला तत्कालीन खासदार रावसाहेब दानवे यांनी मंजूरी आणली असेल? की माजी आमदार अर्जून खोतकरांनी यावर (Jalna) जालन्यात जोरदार चर्चा सुरू आहे. रावसाहेब दानवे यांनी काल टीका केल्यानंतर आज खोतकरांनी त्यांना उत्तर दिले. जालना शहरासाठीच्या पाणी पुरवठा आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या श्रेयावरून दानवे-खोतकर यांच्यात राजकीय कलगितुरा रंगला आहे.

Arjun Khotkar-Raosaheb Danve News
Raosaheb Danve V/S Abdul Sattar News : रावसाहेब दानवे मुळावर घाव घालणार! सिल्लोड नगर परिषदेत सत्तारांना धक्का देण्याची तयारी

अर्जून खोतकर यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला आपण मंजूरी आणि निधी आणल्याचे सिद्ध झाले नाही, तर त्यांची आयुष्यभर गुलामी करू, अशा शब्दात दानवे यांना आव्हान दिले. मुलं आम्ही जन्माला घातली तर ती आमचीच म्हणणार ना, असा टोलाही त्यांनी लगावला. जे काम खासदार म्हणून रावसाहेब दानवे यांनी केले, त्याचे श्रेय त्यांनाच दिले गेले पाहिजे, ते आम्ही कधीही घेणार नाही.

Arjun Khotkar-Raosaheb Danve News
Jalna Assembly Election : पाच वर्षात रखडलेल्या विकासाची पोकळी भरुन काढायची आहे : अर्जुन खोतकर

पण जे काम मी केले, ते केल्याचे म्हणायला मोठे मन लागते, आम्ही तुमच्या सारखे कोत्या मनाचे नाही,असेही खोतकर म्हणाले. आपल्याला या वादात पडायचे नाही, जालनेकरांना दिलेली आश्वासन, चांगल्या पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज देणे याला आपले प्राधान्य असणार आहे. कोणी जालन्याला कॅलिफोर्निया करू म्हणतो, तर कोणी लंडन, पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का? असा टोला खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनाही लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com