Raosaheb Danve : 'माझं बरं चाललंय, तुमचं कसं?' पराभवानंतर रावसाहेब दानवेंनी मतदारांना घेतला जाहीर सभेत चिमटा! काँग्रेस खासदारालाही डिवचलं

Jalna Politics Raosaheb Danve Challenges MP Kalyan Kale : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव झालेल्या भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Jalna Politics : भाजपचे पाच टर्म खासदार, दोनवेळा केंद्रात राज्यमंत्री, राज्याचे प्रदेशाध्यक्ष, दोनवेळा आमदार, गावचे सरपंच असा राजकीय वाढता आलेख असलेल्या रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पदोपदी आठवतो आहे. नुकतेच एका जाहीर भाषणात दानवे यांनी मतदारांना ‘माझं बरं चाललंय, तुमचं कसं?’ असे म्हणत चिमटा काढला.

तुम्ही निवडून दिलेला खासदार कधी गावात आला का? त्याने काय काम केले, हे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काठी घेऊन विचारलं पाहिजे. एकदा त्याला अन् मला समोरासमोर बोलवा आणि कलगीतुरा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही त्यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना दिले.

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा कल्याण काळे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दानवे निवडून आले असते, तर त्यांची डबल हॅट्ट्रिक झाली असती आणि ते केंद्रात कॅबिनेट मंत्री झाले असते. परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला आणि कल्याण काळे यांनी बाजी मारली.

Raosaheb Danve
Raosaheb Danve News: भाजपवर गंभीर आरोप,महायुतीच्या उमेदवाराविरोधात मुलाचं बंड; शिवसेनेच्या सत्तारांना दानवेंचं चॅलेंज

मतदारांवर थेट नाराजी व्यक्त करता येत नसल्याने रावसाहेब दानवे अधूनमधून भाषणातून त्यांची फिरकी घेत असतात. फरदापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात, निवडणुकीत पडल्यानंतर मी घरात बसून नाही राहिलो, दुसऱ्या दिवशीपासून बाहेर पडलो, पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. आताही मी सहा देशांत फिरून आलो. माझं एकदम चांगलं सुरू आहे, मी सध्या मोकळा आहे, पण तुमचं काय?

Raosaheb Danve
Raosaheb Danve : "नको तिथे नाक खुपसू नका!" रावसाहेब दानवेंनी राऊत अन् ठाकरेंना सुनावले!

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराचं भाषण मी ऐकलं. म्हणे, तुमच्यामुळे मी दिल्लीत राहुल गांधी यांच्या शेजारी बसतो. मी सभागृह बंद करून दाखवले, वा रे तुमचे काम! माझे कल्याण काळेंना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्यासमोर यावं. तुम्ही काय केलं आणि मी काय केलं? याचा एकदा कलगीतुरा होऊन जाऊ द्या. तुम्हीही कर्तृत्ववान लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, असे म्हणत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com