Raosaheb Danve : "नको तिथे नाक खुपसू नका!" रावसाहेब दानवेंनी राऊत अन् ठाकरेंना सुनावले!

Raosaheb Danve on Shiv Sena worker exodus : रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यकर्त्यांच्या गळतीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटला.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

BJP-Shivsena UBT News : 'उबाठा' पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे नेते संजय राऊत यांना आता काही काम राहिलेलं नाही. उठसूट भाजपवर टीका करायची एवढाच त्यांचा रोजचा धंदा आहे. पश्चिम बंगालसह तीन राज्यात आमच्या पक्षाने मोठा विजय मिळवला. याचा तिथे पक्ष नाही, हे तिथे निवडणूक लढवत नाहीयेत, मग विनाकारण टीका कशासाठी? असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना लगावला.

भारतीय जनता पार्टी व आमचे नेते कुठलीही निवडणूक ही गांभीर्याने घेतात. जेव्हा देशाची, राज्याच्या निवडणूक असते तेव्हा कार्यकर्ते पक्षाचे काम करत असतात. जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते, तेव्हा नेते त्यांच्या प्रचाराला जातात. पश्चिम बंगालमधील निवडणूक ही तेथील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची निवडणूक होती. तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रचारासाठी गेले, तर त्यात गैर काय?

Raosaheb Danve
Child Abuse Case : उपचाराच्या नावाखाली 55 वर्षांच्या नराधम भोंदू बाबाचा 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; महाराष्ट्रात पुन्हा हादरला

संजय राऊत यांना टीका करण्याशिवाय दुसरा उद्योग आता राहिलेला नाही. त्यामुळे दररोज माध्यमांसमोर जायचे आणि महायुतीवर टीका करायची, एवढेच काम त्यांना शिल्लक राहिले आहे. भाजपावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आपला पक्ष सावरावा, त्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते दररोज दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे, उगाच इतरांच्या कामात नाक खुपसू नये, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका केली. 'भाजप 365 दिवस फक्त निवडणुका जिंकण्याचा सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री 20-20 दिवस बंगालमध्ये राहतात. अशा परिस्थितीत ही खरी लोकशाही निवडणूक म्हणता येणार नाही,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

विरोधकांनी निवडणुका लढवू नयेत अशी भाजपची मानसिकता असल्याचे दिसते. तसेच पाकिस्तान आणि रशियामधील निवडणुकांप्रमाणेच भारतातही निकाल आधीच ठरलेले असल्याचा आरोप राऊत यांनी माध्यमांशी केला होता. महिला मतदारांच्या पाठिंब्याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Raosaheb Danve
Teacher Missing News : सिंधुदुर्गमध्ये शाळेतील झेंडावंदन करून शिक्षिका अचानक बेपत्ता : कोल्हापूरमध्ये 8 वर्षांचा मुलगा बघतोय आईची वाट

'महिला विधेयक मंजूर झाले, पण अंमलबजावणी कुठे आहे? केरळमध्ये महिला साक्षरता जास्त असूनही भाजपला तिथे यश का मिळाले नाही?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका करत त्यांना फटकारले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com