Santosh Deshmukh Murder : पोलिसांवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती कुठाय? संतोष देशमुखांच्या बहिणीचा जळजळीत सवाल

Santosh Deshmukh's Sister Reaction : संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. अन्यथा आमच्या कुटुंबावर फार मोठा डोंगर कोसळेल.
Santosh Deshmukh-Walmik Karad
Santosh Deshmukh-Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Beed, 31 December : पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती सध्या कुठाय? शंभरपेक्षा जास्त पोलिस तपास करत आहेत, असे म्हणता तर फरारी आरोपींना लवकरात लवकर का पकडलं जात नाही. कारण, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेला बावीस दिवस झाले आहेत. फरारी आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. पण, ते काय करताहेत, हेच कळत नाही, असे सवाल संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या बहिणीने उपस्थित केले आहेत.

खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा आज पुण्यात सीआयडी पोलिसांना स्वतःहून शरण आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या संथ गतीच्या तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले.

त्या म्हणाल्या, वाल्मिक कराड हा स्वतःहून शरण आला आहे. त्याला पोलिसांनी कुठं पकडलंय. यातील आणखी तीन आरोपी कुठे आहेत, हे तर माहितीही नाही. त्याच्या मागचेही आणखी कोणी आहेत, तेही कुठे आहेत, हे माहिती नाही? आरोपींना कधी पकडणार?, न्याय तर लांबच राहिला.

Santosh Deshmukh-Walmik Karad
Anjali Damania : कराड सरेंडर, दमानिया पुन्हा आक्रमक; पोलिसांबाबत मोठा दावा; म्हणाल्या,'...तर आम्हांला न्याय कसा मिळणार..?

संतोष देशमुख यांचा खून होऊन आज २२ दिवस झाले आहेत. हे कुटुंब जीवंत राहतंय का की मरतंय? मग हे करताहेत काय तरी काय? सर्व सत्य परिस्थिती आहे, यात चुकीचं काहीच नाही. पण, एका देवमाणसाला लवकर न्याय मिळत नाही. हे क्लेषदायक आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, या खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. अन्यथा आमच्या कुटुंबावर फार मोठा डोंगर कोसळेल. एक गेला मला माहिती नाही बाकीचं काय होईल, हे सांगू शकत नाही. त्याची कल्पनाही करवू शकत नाही. संतोष देशमुख यांची आई, माझी भावजय काय अवस्थेत आहेत, हे आमचं आम्हाला माहिती. न्याय मिळाल तर थोडंसं समाधान तरी मिळेल. आरोपींना पकडलं तर आम्हाला कुटुंबीयांना समाधान वाटेल. त्या फरार तीन आरोपींना पकडलं पाहिजे. न्याय मिळाल्याशिवाय आमच्या कुटुंबीयांचे समाधान होणार नाही.

Santosh Deshmukh-Walmik Karad
Walmik Karad surrender news : फडणवीस-मुंडेंनी घडवलेले नाट्य तर नाही ना? भास्कर जाधवांना वेगळाच संशय

एवढी पोलिस यंत्रणा आहे म्हणता तर आरोपींना लवकरात लवकर का शोधत नाहीत. कारण खुनाची घटना होऊन बावीस दिवस झाले आहेत. पोलिसांनी फरारी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. पण ते काय करतात, हेच कळत नाही. असे कसे काय आरोपी सापडत नाहीत. आतापर्यंत आरोपी सापडायला हवे होते. आरोपींचा शोध का लागत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com