EX MLA Rajesh Tope News : राजेश टोपेंच्या अर्जानंतर घनसावंगी मतदारसंघात होणार ईव्हीएमची फेरतपासणी

Recount to be held in Ghansavangi after Rajesh Tope's demand :28 नोव्हेंबर रोजी टोपे यांनी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी अर्ज दाखल केला होता. त्यानूसार मतदारसंघातील पाच मशीनची तपासणी केली जाणार आहे.
EX MLA Rajesh Tope News
EX MLA Rajesh Tope NewsSarkarnama
Published on
Updated on

उमेश वाघमारे

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले. यापैकीच एक असलेल्या घनसांवगी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार माजी मंत्री राजेश टोपे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानूसार पाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची फेरतपासणी केली जाणार आहे.

राजेश टोपे (Rajesh Tope) यांचा या मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी 2840 मतांनी पराभव केला. महायुतीला दोनशे पार जागा मिळाल्यापासून ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

EX MLA Rajesh Tope News
Ghansawangi Assembly Constituency: राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली, त्यांचे जागतिक स्तरावर कौतुक

या शिवाय काँग्रेस ईव्हीएमऐवजी बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात यासाठी देशपातळीवर चळवळ उभारणार असल्याचे सांगितले आहे. (NCP) या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक मतदारंसघांमध्ये पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यात घनसांवगी मतदारसंघातील राजेश टोपे यांचा देखील समावेश आहे.

EX MLA Rajesh Tope News
Sharad Pawar: मारकडवाडीत शरद पवार कडाडले, 'बॅलेटवर मतदान घ्या, निवडणूक पद्धत बदला' VIDEO पाहा

28 नोव्हेंबर रोजी टोपे यांनी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी अर्ज दाखल केला होता. त्यानूसार मतदारसंघातील पाच मशीनची तपासणी केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या विधासनभा निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले राजेश टोपे यांचा निसटता पराभव झाला.

EX MLA Rajesh Tope News
उढाण यांना आमदार करा ,शिवसैनिकांनी ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र  

टोपे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली होती. शिवाय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक विभागाच्या वतीने घनसावंगी मतदारसंघात मतदान प्रक्रियेत शिंदे वडगाव, बोररांजनी, सुखापुरी, शेवगा आणि तीर्थपुरी जायकवाडी वसाहत येथील पाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी केली जाणार आहे.

EX MLA Rajesh Tope News
EVM Controversy : ईव्हीएम 'ओक्के', नांदेडमध्ये 75 मतदान केंद्रावरील तपासणीत आकडे जुळले!

अधिकारी, अभियंते आणि उमेदवारांसमोर एका ईव्हीएमवर सुमारे एक हजार 400 पर्यंत मतदान केले जाणार आहे. झालेले मतदान आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये नोंदवलेले मतदान, याची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com