Vilasrao Deshmukh memories : 'हृदय अजूनही एका स्पर्शासाठी अन्...'; विलासरावांच्या जयंतीदिनी रितेश देशमुखांची भावनिक पोस्ट

Ritesh Deshmukh emotional post News : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची 80 वी जयंती सोमवारी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
Vilasrao Deshmukh memories
Vilasrao Deshmukh memories Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची 80 वी जयंती सोमवारी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विलासबागेतील त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी देशमुख परिवारातील सदस्यांसह काँग्रेसच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याच वेळी त्यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांनी फेसबुकला भावनिक पोस्ट करीत त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.

विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या 80 व्या जयंतीच्या निमित्ताने सोमवारी विलासबागेत स्मृतीस्थळी त्यांचे कुटुंबीय तसेच हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेही मंडळींच्या उपस्थितीत पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या भावस्वरांजलीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

Vilasrao Deshmukh memories
Rupali Patil Vs Rupali Chakankar : 'तो' व्हिडिओ व्हायरल, रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना धू धू धुतले, म्हणाल्या, 'चाकणकर आयोगावर...'

'आधी आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करायचा विचार केला होता पप्पा, पण आता तुमचे नातवंडे हा दिवस त्यांच्या "आजोबांचा दिवस" म्हणून साजरा करू इच्छित आहेत. लातूरमधील बाभळगावला येणे म्हणजे तुमच्या मिठीत परत धावून आल्यासारखे वाटते. समाधान, तृप्ती, आनंद, परमशांती.

हृदय अजूनही तुमच्या त्या एका स्पर्शासाठी, त्या एका मिठीसाठी, आणि त्या एका हसऱ्या चेहऱ्यासाठी तळमळते, जे सगळं काही ठीक करते... आम्हाला माहिती आहे, तुम्ही वरून आमच्यवर लक्ष ठेवून आहेत. खूप आठवण येतीय पप्पा, अशी पोस्ट अभिनेते रितेश देशमुख यांनी फेसुबकवर करीत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Vilasrao Deshmukh memories
Modi government 11 years : धुव्वाधार सुरुवात करणाऱ्या मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण; आता वाटचालीत असतील 'ही' आव्हाने

यावेळी विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जिनेलिया-देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबातील नातेवाइकांनी समाधीस्थळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Vilasrao Deshmukh memories
NCP News : अजित पवारांचे विश्वासू अशोक डक भाजपाच्या वाटेवर? जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी मिळणार

त्यासोबतच या आदरांजली सभेस लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्यासह लातूर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेहमंडळींने आदरांजली अर्पण केली.

Vilasrao Deshmukh memories
Rohit Pawar on Rupali Chakankar : रोहित पवार रुपाली चाकणकरांचं पदच गिळणार, आगामी अधिवेशनात करणार मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com