Modi government 11 years : धुव्वाधार सुरुवात करणाऱ्या मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण; आता वाटचालीत असतील 'ही' आव्हाने

Narendra Modi governance journey News : पंतप्रधान मोदी यांची ही 11 वर्षांची कारकीर्द अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत देशात अनेक सकारात्मक बदल घडवण्याचा एक व्यापक प्रयत्न केला आहे.
Narendra modi
Narendra modi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर त्यांनी 26 मे 2014 रोजी सूत्रे हाती घेतली होती. पीएम मोदी यांनी त्यांच्या या 11 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थपित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही 11 वर्षांची कारकीर्द अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत देशात अनेक सकारात्मक बदल घडवण्याचा एक व्यापक प्रयत्न केला आहे.

2014 पूर्वी देशात सतत दहा वर्ष काँग्रेसप्रणित आघाडी सरकार सत्तेत होते. 2004 ते 2014 या दहा वर्षाच्या काळात काँग्रेसचे नेते मनमोहन सिंह पंतप्रधान होते. त्यांच्या कारभारावर जनतेची नाराजी होती. विशेषतः या दहा वर्षात देशात मोठ्या प्रमाणात महागाई व भ्रष्टाचार वाढला होता. त्यामुळे काँग्रेस सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपप्रणित सरकारला बहुमत मिळाले.2014 आणि 2019 व त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले, जे अनेक दशकांनंतर प्रथमच घडले.

त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. 2014 पासून आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशात मोठ्या प्रमाणात विकास करताना देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांची "सबका साथ, सबका विकास" ही टॅगलाईन मतदारांना चांगलीच भावली. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात त्यांना झाला.

Narendra modi
Amit Shah: अमित शहांनी काढले काँग्रेस नेत्यांचे संस्कार; म्हणाले, ते काहीही बोलतात...

मजबूत नेतृत्व आणि लोकप्रभाव :

पीएम मोदी यांची सामान्य जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली अनेकांना भावली आहे. त्यामुळेच गेल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत भाषणकौशल्य आणि कार्यशक्तीमुळे लोकांमध्ये त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण झाले आहे. त्याचा फायदा त्यांना आतापर्यंतच्या तीन निवडणुकीत झाला आहे. त्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करता आली आहे. 2014 पासून आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभासोबतच अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत.

Narendra modi
Rupali Patil Vs Rupali Chakankar : 'तो' व्हिडिओ व्हायरल, रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना धू धू धुतले, म्हणाल्या, 'चाकणकर आयोगावर...'

भाजप अन् संघटनशक्ती :

भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंघटनेचा मजबूत आधार राहिला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सहकार्याने मोदींनी संपूर्ण देशभरात भाजपचे संघटन प्रभावी केले आहे. बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांचे नेटवर्क त्यांनी उभे केले आहे. या नेटवर्कचा त्यांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळेच देशात खऱ्या अर्थाने भाजपचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Narendra modi
Sushma Andhare : चाकणकरांच्या गँगकडून गलिच्छ पद्धतीने फोटो मॉर्फ करून महिला नेत्यांची बदनामी! अजितदादा दखल घेणार?

उत्तर भारतातील प्रबळ पकड :

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गुजरात, झारखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपला समर्थन मिळत आहे. त्याचा फायदा या राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपला झाला. त्यामुळेच या राज्यात भाजपचे सरकार टिकून आहे. हिंदुत्व विचारसरणीला अनुसरून एकसंध मतदार तयार झाले आहेत. त्याचा प्रत्येक निवडणुकीत फायदा होत आहे.

Narendra modi
Rupali Chakankar News : वैष्णवीच्या घरासमोर चाकणकरांना घेरलं, काय घडलं?

विकासाचे आश्वासन आणि गरिबांपर्यंत पोहोच

पीएम नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधणी, जनधन योजना यामुळे ग्रामीण आणि शहरी गरीब वर्गाचा विश्वास मिळवला आहे. त्याचा प्रत्येक निवडणुकीत त्यांना फायदाच झाला आहे. विशेषतः महिलांमध्ये त्यांनी राबवलेल्या योजना अधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळे महिला वर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

राष्ट्रहित आणि सुरक्षा

पीएम मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर, कलम 370 हटवणे, तीन तलाक विरोधी कायदा, सीएए या निर्णयांनी पारंपरिक हिंदू मतदार अधिक दृढ झाले. त्याचा फायदा त्यांना आतापर्यंतच्या निवडणुकीत झाला आहे. त्यासोबतच राष्ट्रहित आणि सुरक्षा हे मुद्दे लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करतात.

Narendra modi
Rohit Pawar on Rupali Chakankar : रोहित पवार रुपाली चाकणकरांचं पदच गिळणार, आगामी अधिवेशनात करणार मोठी मागणी

विकासाभिमुख धोरण:

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या उपक्रमांनी देशात नव्या घडामोडींना चालना दिली. उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना अशा योजनांनी सामान्य जनतेच्या जीवनात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने केला.

परराष्ट्र धोरण:

जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. विविध देशांशी मजबूत संबंध प्रस्थापित करण्यात आले. संरक्षण आणि सुरक्षेचा विचार करता त्यांनी सर्जिकल स्ट्राईक (२०१६) आणि बालाकोट एअर स्ट्राईक (2019) या घटकांमुळे भारताने आपली संरक्षणक्षमता दाखवून दिली.

Narendra modi
BJP leader Arrested : महामार्गावरच गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध; भाजप नेता अखेर गजाआड; Video झाला होता व्हायरल

महत्त्वाचे निर्णय :

गेल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), तीन तलाक विरोधी कायदा, राम मंदिर वादाचा निकाल आणि मंदिर बांधकामास सुरुवात करीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

कमकुवत विरोधी पक्ष

गेल्या 11 वर्षांपासून केंद्रात भाजपप्रणित सरकार सत्तेत आहे. त्यांच्या विरोधात आक्रमकपणे आवाज उठवणारा विरोधी पक्ष नाही. त्याचा फायदा भाजपला झाला. सुरुवातीच्या दोन टर्ममध्ये विरोधी पक्षनेता देखील नव्हता. या तिसऱ्या टर्ममध्ये काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची कामगिरी उंचावली आहे. दहा वर्षात विरोधातील नेतृत्व ठोस नसले, आणि अंतर्गत फूट-मतभेदांमुळे मोदींच्या विरोधात एकत्रित संघर्ष कमी प्रभावी ठरला आहे.

Narendra modi
BJP Sujay Vikhe On Ajit Pawar : सुजयदादा अजितदादांसाठी मैदानात, 'टार्गेट' करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, 'ठाकरे अन् पवारांच्या नेत्यांना लग्नपत्रिकाच नसते

सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर:

नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया, मन की बात, मोदी अॅप, ट्विटर, फेसबुक यांचा अत्यंत कौशल्याने वापर करून जनतेशी थेट संपर्क ठेवला आहे. तरुण वर्गात त्यांची प्रतिमा "टेक-सेव्ही आणि दृढ निश्चयी" नेता म्हणून तयार झाली आहे. त्याचा त्यांना नेहमीच फायदा झाला आहे. आता पर्यंत त्यांनी सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्याला युवा वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच त्यांची युवा वर्गात मोठी लोकप्रियता आहे.

Narendra modi
Satyajeet Tambe food culture : राजकारणातील 'डिनर डिप्लोमेसी'; सत्यजीत तांबेंना आठवले राणेंकडील 'मासे', राऊतांकडील 'तरी-पोहा' अन् बरचं काही...

डबल इंजिन सरकार संकल्पना :

केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे, यासाठी प्रचारात "डबल इंजिन" विकासाची धारणा त्यांनी प्रभावीपणे मांडली. यामुळे अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला. त्यांची ही संकल्पना अनेक जणांना आवडली आहे. त्यामुळेच काही राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. त्यांच्या या घोषणेचा काही राज्यात फायदा झाला आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांचा राजकीय पाया फक्त त्यांच्या लोकप्रियतेवर नाही, तर संघटीत पक्ष यंत्रणा, स्पष्ट विचारसरणी, जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या योजना, आणि कमजोर विरोधी पक्ष यावर आधारित आहे. त्यामुळे ते आजही देशातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत.

Narendra modi
Modi NITI Aayog meeting : मोदींची विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसोबत 'दिलखुलास चर्चा' अन् हास्य, विनोदाने बदलले वातावरण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com