Rohit Pawar News : ''मंत्र्यांचे OSD हॉटेलमध्ये बसून कामे करतात आणि....'' ; रोहित पवारांचं मोठं विधान!

Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रेदरम्यान बीड येथे रोहित पवारांनी नागरिकांशी संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या.
Yuva Sangharsh Yatra
Yuva Sangharsh YatraSarkarnama
Published on
Updated on

Beed News : ''सरकारचा एकही मंत्री लोकांमध्ये नाही. मंत्र्यांचे ओएसडी हॉटेलमध्ये बसून कामे करतात आणि मग मंत्री फायलींवर सह्या करतात. दुष्काळसदृश आणि दुष्काळी तालुके जाहीर करताना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीत भेदभाव केला जात आहे,'' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yuva Sangharsh Yatra
Raju Shetti Vs Sadabhau Khot : राजू शेट्टींना सदाभाऊंचा इशारा; म्हणाले, 'ऊस तोडायला कोण आडवा आला तर...'

बीडमध्ये युवा संघर्ष यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी रोहित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर काही गंभीर आरोप केले. याशिवाय शेतकरी समस्यांवरूनही टीका केली. याशिवाय वरच्या भागाने मराठवाड्याला पाणी द्यावे, असे मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले.या प्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलिम, डॉ. नरेंद्र काळे, गंगाभीषण थावरे, शिवराज बांगर आदी उपस्थिेत होते.

याशिवाय रोहित पवार म्हणाले, ''महिला युवक, शेतकरी, विद्यार्थी व्यापारी आदींसंदर्भातली जवळपास ३५ मुद्दे घेऊन ही यात्रा निघाली होती. मात्र, या घटकांशी यात्रेदरम्यान संवाद साधल्यानंतर मुद्दे वाढत आहेत. पहिल्यांदाच ४० दुष्काळग्रस्त तालुके घोषित करण्यात आले आहेत.

Yuva Sangharsh Yatra
Maratha Reservation: गावबंदी कोणी केली ? त्यावेळी दोन समाजात वितुष्ट येते असे वाटले नाही का ? भुजबळांचा सवाल

शेतकरी आक्रोशानंतर दुसरी यादी सरकारने जाहीर केली असली, तरी मदतीच्या निकषांत तफावत असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच एनडीआरएफच्या निकषाच्या पाचपट मदत असावी. इंधन, खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. सरकारने शैक्षणिक शुल्क माफ करावे, विम्याचे पैसे दिल्याच्या गोड बातमीचे नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावे, दूध भावात घसरण झाली आहे, कपाशीचे भाव पडले असल्याचेही रोहित पवारांनी या वेळी सांगितले.

एका अधिकाऱ्याने सर्व्हे करून शेतकरी आत्महत्यांबद्दल अहवाल दिला. मात्र, यावर सरकार काहीही बोलायला तयार नाही. भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी कंपन्या बंद पाडल्या जात आहेत का? हे तपासणार असल्याचे म्हणत त्यांनी नाव न घेता येथील सुरेश कुटे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल टिप्पणी केली.

Yuva Sangharsh Yatra
Bhandara News : गोसीखुर्द प्रकल्पाबद्दल अजितदादांनी बोलणं सुरू करताच घोषणाबाजीचा ‘प्रहार’

याचबरोबर भाजपच्या काळात नर्मदेचे पाणी गुजरातला दिल्याचा आरोप करत सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवावा, जलसिंचन प्रकल्प राबवावेत, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली, तर बुलेट ट्रेनचे तिकीट विमानापेक्षा महाग आहेत. जपान पिण्याच्या पाण्यासाठीदेखील कर्ज द्यायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com