Kolhapur Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दरावरून आणि मागील हंगामातील चारशे रुपये देण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. 'ऊस तोडायला कोण आडवा आला, तर आम्ही त्याच्या आडवे येऊ, असे सदाभाऊंनी नाव न घेता शेट्टींना इशारा दिला आहे.
शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर सदाभाऊ म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या नेत्यांनी उसाला यंदाचा 3500 दर मिळवून द्यावा, तर गतवर्षीचा 400 रुपये मिळवून दिले तर मी राजकीय संन्यास घेईन. त्यांनी हा दर दिला नाही तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. यापुढे त्यांनी कोणतीही निवडणूक लढवू नये,' असे आवाहनही केले आहे. यामुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानीच्या मागणीला विरोध करत खोत यांनी सांगितले, 'रयत क्रांती संघटनेच्या वतीने समिती स्थापन करून उसाला पहिली उचल 3250 द्यावी, तर गतवर्षीचा 200 रुपये फरक द्यावा, ही मागणी आपण करणार आहे. कारखानदारांनी यावर लवकर बैठक बोलावून निर्णय घ्यावा. कारखानदारांनी आमची मागणी मान्य केल्यास, आम्ही कारखानदारांच्या पाठीशी राहू. ऊस तोडायला कोण आडवे येत असेल, तर त्यांच्या आडवे आम्ही जाऊ,' अशा शब्दांत खोत यांनी शेट्टींना सुनावले.
शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध
टाकळीवाडीतील माजी सैनिक नंदकुमार कांबळेंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्याचा निषेध सदाभाऊ खोत यांनी केला. 'शेतकरी माजी सैनिक नंदकुमार कांबळेंचा ऊस वाळत असल्यामुळे त्यांनी स्वतःहून तोडणी करण्यास सुरुवात केली. त्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. कांबळे देशसेवा करून हे आता शेती करत आहेत. हा गुन्हा झाला काय ?,' असा सवालही खोतांनी उपस्थित केला.
(Edited by Sunil Dhumal)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.