Mahayuti Politics : भाजपचा मोठा डाव शिंदेंनाच विरोधी पक्षनेता बनवणार; अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

Anjali Damania On Mahayuti Govt : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आजारी पडले आहेत. दरे गावातून ठाण्याला आलेल्या शिंदेंची काल भाजप नेते गिरीश महायन यांनी भेट घेतली आणि युतीत कोणतेही मतभेद नसल्याचं जाहीर केलं. मात्र, या सर्व नाराजीच्या नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Amit Shah, Narendra Modi, Anjali Damania, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Amit Shah, Narendra Modi, Anjali Damania, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Dec : महायुती सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. या शपथविधीची जय्यत तयारी देखील सुरू आहे. महायुतीच्या शपथविधीला अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र, तरीही अद्याप कोणाला कोणतं खातं दिलं जाणार याबाबतचा निर्णय झालेला नाही.

शिवाय भाजपचे वरिष्ठ नेते काही धक्कातंत्राचा अवलंब करणार का? याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असेल तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि गृहखातं द्यावं अशी मागणी शिंदेसेनेकडून केली जात आहे.

दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या आजारी पडले आहेत. दरे गावातून ठाण्याला आलेल्या शिंदेंची काल भाजप नेते गिरीश महायन यांनी भेट घेतली आणि युतीत कोणतेही मतभेद नसल्याचं जाहीर केलं. मात्र, या सर्व नाराजीच्या नाट्यमय घडामोडी सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे.

दमानिया (Anjali Damania) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी भाजपकडूनच हालचाली सुरू असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते.

Amit Shah, Narendra Modi, Anjali Damania, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Markadwadi Voting : 'बॅलेटसाठी बुलेट झेलू' गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा तर मतदान न घेण्याचा प्रशासनाचा इशारा, मारकडवाडीत नेमकं काय चाललंय?

चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले. 'दाल मे कूछ काला है.' ते पत्रकार मला म्हणाले की, 'भाजपचीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे, त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल आणि विरोधी पक्षनेता पण ह्यांचाच . बाकी सगळे साफ, तसेच होतांना दिसतंय." असा दावा दमानिया यांनी केला आहे.

Amit Shah, Narendra Modi, Anjali Damania, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Akshay Shinde Encounter Case: CID चे वर्तन संशयास्पद, अक्षय शिंदे प्रकरणात तुम्ही गंभीर नाही; हायकोर्टाचे ताशेरे

त्यामुळे आता त्यांच्या या ट्विटवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, महायुतीच्या शपथविधी सोहळा ज्या मैदानात होणार आहे. त्या मैदानाच्या पाहणीवरून देखील आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी नाराजी दर्शवली आहे.

ते म्हणाले, "शपथविधिच्या मैदानाची पहाणी करायला एकाच पक्षाचे नेते जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. आम्हालाही कळवलं असत तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाणार होतो, मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही. जनतेने गैरसमज करु नये. आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com