Ambadas Danve News : संतोष देशमुख हत्येला तेरा दिवस झाले, तरी मुख्य आरोपी मोकाट; उद्धवसेना न्यायालयात धाव घेणार!

Rush to the bench for the arrest of absconding accused including Valmik Karad : आरोपी एवढे दिवस फरार असल्याने ते पुरावे सहज नष्ट करतील यात शंका नाही. आणि उद्या कारवाई झाली जरी तर पुराव्या अभावी ते दुसऱ्या दिवशी बाहेर असतील.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र आणि देशात चर्चा होत असलेल्या (Beed News) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तेरा दिवस उलटले आहेत. या घटनेने संपुर्ण राज्य हादरून गेलेले असताना अजूनही सात पैकी मुख्य तीन आरोपी फरार आहेत. महायुती सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईटहॅंड म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड व इतर दोन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाहीयेत.

गृह खाते अशा प्रकारे निष्काळजीपणा करून दोषी आरोपीं मोकाट फिरत असतील तर या विरुद्ध आम्ही दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात Criminal Writ Petition दाखल करणार आहोत, असे शिवसेना नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली. आपल्या फेसबुक पेजवरून दानवे यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त करत एक पोस्ट व्हायल केली आहे.

Ambadas Danve News
Shivsena News: आदित्य ठाकरेंमुळे भाजप-सेना युती तुटली, शिंदे सेनेच्या प्रवक्त्याचा थेट आरोप

यात त्यांनी 13 दिवस उलटले तरी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्यारी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी फरार आहेत. जर गृह खाते अशा प्रकारे निष्काळजीपणा करून दोषी आरोपीं मोकाट फिरत असतील तर या विरुद्ध आम्ही दाद मागण्यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालय, संभाजीनगर खंडपीठात फौजदारी स्वरुपाची याचिका दाखल करणार आहोत.

Ambadas Danve News
Beed Crime News : मुख्यमंत्री फडणवीस यांची सभागृहात घोषणा अन् सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल!

आरोपी एवढे दिवस फरार असल्याने ते पुरावे सहज नष्ट करतील यात शंका नाही. आणि उद्या कारवाई झाली जरी तर पुराव्या अभावी ते दुसऱ्या दिवशी बाहेर असतील, असा धोका अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख खून प्रकरणात विधिमंडळात सर्वप्रथम अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड याच्या नावाचा उल्लेख केला होता. एवढेच नाही तर त्याचा राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांशी संबंध असल्याची चर्चा असल्याचे म्हटले होते.

Ambadas Danve News
Sharad Pawar Visit Massajog : दहशतीतून बाहेर पडा, सगळे मिळून परिस्थितीला तोंड देऊ..

त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह सर्वांनीच वाल्मिक कराड याच्या दहशत आणि गुन्हेगारी कारवायांमधील सहभागाचा पाढा वाचला होता. पवनउर्जा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड अधिवेशन काळात नागपूरमध्येच होता, तो कोणच्या फार्महाऊसवर थांबलेला होता त्याचे नाव देखील मी सांगू शकतो, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले होते.

Ambadas Danve News
MLA Sandip Kshirsagar News : 'वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्याच्यामुळेच जिल्हा अशांत', संदीप क्षीरसागरांचा शरद पवारांसमोर आरोप

अद्याप वाल्मिक कराड व इतर मुख्य आरोपी फरार असल्याने अंबादास दानवे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी स्वरपाची याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच संतोष देशमुख खून प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येत असल्याने त्याच्या अटकेसाठी सरकारवर दबाव वाढत असल्याचे दिसून येते. मस्साजोग येथे भेट दिल्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com