Shivsena News: आदित्य ठाकरेंमुळे भाजप-सेना युती तुटली, शिंदे सेनेच्या प्रवक्त्याचा थेट आरोप

Political News : महायुतीची पुन्हा राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. मात्र भाजप-सेना युती कोणामुळे तुटली यावर अद्यापही रोज नवनवे दावे, खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
Aditya Thackrey
Aditya Thackreysarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजप आणि शिवसेनेची युती तुटून आता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दुसरी सेना तयार झाली आहे. महायुतीची पुन्हा राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. मात्र भाजप-सेना युती कोणामुळे तुटली यावर अद्यापही रोज नवनवे दावे, खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यामुळेच युती तुटल्याचे सांगून नव्या वादाला तोंड फोडले आहे. (Shivsena News)

2019 मध्ये भाजप आणि शिवसेना (Shivsena) एकत्रित लढली होती. युतीला बहूमत प्राप्त झालले होते. हे बघता पुन्हा राज्यात युतीची सत्ता येणार असल्याचे दिसत होते. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून युतीमध्ये वाद निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे बंद दारआड आश्वासन दिले होते असे सांगितले.

Aditya Thackrey
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला 24 तास पूर्ण होण्याआधीच अविनाश बारगळांची बदली, आता 'हे' असणार बीडचे नवे पोलिस अधीक्षक

त्यांनी मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडण्यास नकार दिला. शरद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी तयार झाली आणि सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

Aditya Thackrey
Santosh Deshmukh Murder Case : CM फडणवीसांनी आरोपींना शिक्षा करण्याची घोषणा करताच, संतोष देशमुखांच्या मुलीने केली 'ही' मोठी मागणी

अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकराल्यास सरकार पडले. राज्यात महायुतीची सत्ता आली. या सर्व घडामोडींवर बोलताना दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि ते काँग्रेससोबत गेले असा दावा केला. त्यांच्यामुळेच युती तुटली असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Aditya Thackrey
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे यांना कोण वाचवत आहे?

शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर दणकून टीका केली. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अवाक्षर काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते, ही शिवसेनेची ताकद होती. त्याच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले आहे. त्यांनी जनतेमध्ये जायला शकले पाहिजे. त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा, असा मी त्यांना सल्ला देतो असेही केसरकर म्हणाले.

Aditya Thackrey
Devendra Fadnavis : वाल्मिक कराडला अटक होणार का ? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com