Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख केलेला नेता अब्दुल सत्तारांनी 24 तासांत फोडला; मुलगी ZP च्या मैदानात

Chhatrapati Sambhajinagar ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Former Shiv Sena UBT district chief Rajendra Rathod joins Eknath Shinde-led Shiv Sena ahead of Sambhajinagar Zilla Parishad elections, triggering a political setback for Uddhav Thackeray.
Former Shiv Sena UBT district chief Rajendra Rathod joins Eknath Shinde-led Shiv Sena ahead of Sambhajinagar Zilla Parishad elections, triggering a political setback for Uddhav Thackeray.Sarkarnama
Published on
Updated on

ZP Election Rajendra Rathod : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत. महापालिकेतील अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. राठोड हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले असून त्यांच्या मुलीने सोयगाव तालुक्यातील आमखेडा सर्कलमधून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा धक्का बसला असून या धक्क्याचे केंद्र सिल्लोड आणि आमदार अब्दुल सत्तार हेच ठरले आहेत. राजेंद्र राठोड यांच्यावर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने ग्रामीणच्या कन्नड-सिल्लोड-सोयगांव या 3 विधानसभा मतदारसंघाची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच जिल्हा परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या समितीतही संभाजीनगर-जालना जिल्हा परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

समितीत निवड होऊन 24 तास उलटत नाही तोच राजेंद्र राठोड यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सिल्लोड-सोयगावचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि राजेंद्र राठोड यांचे सख्ख्य संपूर्ण तालुक्याला माहित आहे. गेल्यावर्षी झालेल्या सोयगाव बाजार समिती निवडणुकीत राजेंद्र राठोड यांच्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती या तालुक्यात झाली होती. स्वतः राजेंद्र राठोड हे अध्यक्ष झाले आहेत.

Former Shiv Sena UBT district chief Rajendra Rathod joins Eknath Shinde-led Shiv Sena ahead of Sambhajinagar Zilla Parishad elections, triggering a political setback for Uddhav Thackeray.
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत खैरेंना दणका : जिल्ह्याबाहेर रवानगी; संभाजीनगर ZP ची जबाबदारी अंबादास दानवेंकडेच

मुलीसाठी पक्ष सोडला...

राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली या गेल्यावेळी शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना पक्षाने समाज कल्याण सभापतीही केले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही राजेंद्र राठोड हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वबळाचा नारा दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मर्यादित ताकद पाहता मुलीला दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी अखेर राजेंद्र राठोड यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

Former Shiv Sena UBT district chief Rajendra Rathod joins Eknath Shinde-led Shiv Sena ahead of Sambhajinagar Zilla Parishad elections, triggering a political setback for Uddhav Thackeray.
Chhatrapati Sambhajinagr Constituency : संभाजीनगरात शिवसेनाच.. पण बाळासाहेबांची की उद्धव ठाकरेंची ?

आज आपल्या जिल्हाप्रमुख पदासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इकडे राजीनामा पत्र दिले अन् तिकडे राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली राठोड हिने आमखेडा जिल्हा परिषद सर्कलमधून शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. राजेंद्र राठोड हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख होते तरी त्यांचे अब्दुल सत्तार यांच्याशी असलेले राजकीय संबंध कायम होते. जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त साधत राठोड यांनी हे राजकीय संबंध जपले आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत सत्तारांना अपेक्षित भूमिका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com