Chhatrapati Sambhajinagr Constituency : संभाजीनगरात शिवसेनाच.. पण बाळासाहेबांची की उद्धव ठाकरेंची ?

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने विशेषतः शिवसेना ठाकरे गटाने दारूच्या दुकानांचा मुद्दा पुढे करत भुमरेंची कोंडी केली होती. स्वतः भुमरे या प्रचारामुळे वैतागले होते. प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशीच्या शक्ती प्रदर्शनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीरपणे दारूच्या बाटल्या हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाला डिवचले..
Uddhav Thackeray- Eknath Shinde
Uddhav Thackeray- Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagr News : लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघासाठी सोमवारी 63.7 टक्के एवढे मतदान झाले. पाच वर्षापूर्वी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाशी तुलना केली तर यावेळीही तितकेच मतदान झाले आहे. पण वाढलेल्या एक लाख मतदानाचा विचार केला तर काही प्रमाणात मतदान घटल्याचे दिसून आले आहे. एकूणच मतदारांमध्ये बऱ्यापैकी उत्साह होता. सकाळी सात ते काही मतदान केंद्रावर रात्री नऊ वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू होती.

मराठा विरुद्ध ओबीसी हा राज्यभरात असलेला संघर्ष संभाजीनगर मतदारसंघात फारसा दिसला नाही. याचा फायदा महायुतीचे संदीपान भुमरे की महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मतदारांमधी उत्साह सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होता की विरोधात? हे चार जूनला स्पष्ट होईल. काल झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनूसार संभाजीनगरात शिवसेनेचाच विजय होणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray- Eknath Shinde
Raj Thackeray News : भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंकडून बुद्धीभेद

आता ती शिवसेना बाळासाहेबांची असेल? की उद्धव ठाकरे यांची याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीने या लोकसभा मतदारसंघाचा भाग नसलेल्या पैठण विधानसभेचे आमदार आणि विधीमंडळात मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्याची खेळी केली. मराठा कार्ड चालवण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते. बाहेरचा उमेदवार, शिवसेनेशी गद्दारी हे मुद्दे विरोधकांनी लावून धरले होते, पण मराठा या एका सबबीवर भुमरे यांनी त्यावर मात केल्याचे दिसून आले आहे.

शहर व ग्रामीण भागात शिंदेच्या शिवसेनेचे (Shiv Sena) मजबुत संघटन नसतांना केवळ भाजपने लोकसभेसाठी केलेल्या जय्यत तयारीच्या जोरावर भुमरे यांनी ही निवडणूक पुढे नेली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाजपने मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे ही खूनगाठ पक्की बांधल्यामुळे भुमरे यांचे काम सोपे झाले. भुमरेंची आर्थिक रसद आणि भाजपची संघटनात्मक बांधणी असा दुहेरी योग जुळवून आणत उशीरा उमेदवारी जाहीर झालेल्या भुमरेंनी अचानक मुसंडी मारली.

महाविकास आघाडीने विशेषतः शिवसेना ठाकरे गटाने दारूच्या दुकानांचा मुद्दा पुढे करत भुमरेंची कोंडी केली होती. स्वतः भुमरे या प्रचारामुळे वैतागले होते. प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशीच्या शक्ती प्रदर्शनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीरपणे दारूच्या बाटल्या हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाला डिवचले होते. याची चर्चा जिल्हाभरात भरपूर झाली, पण त्याचा प्रभाव मतदानावर फारसा पडला नसल्याचे दिसून आले.

Uddhav Thackeray- Eknath Shinde
Rohit Pawar Politics : 'मुख्यमंत्री दोन तासांसाठी आले मग एवढ्या मोठ्या बॅगा कशाला' रोहित पवारांनी डिवचले

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा भुमरे मामांना मूक पाठिंबा होता की काय? अशी परिस्थिती मतदानाच्या दिवशी होती. ओबीसी समाजही कुठे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात पेटून उठला, असेही चित्र कुठे नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुक लढवण्याचा फारसा अनुभव, जिल्ह्यात संपर्क नसताना केवळ मराठा उमेदवार म्हणून भुमरेंना पहिल्याच निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

मशाल पेटली, पण तेल कमी पडणार...

महाविकास आघाडीने चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली. गेल्या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मोठ्या प्रमाणात झालेले मत विभाजन खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते. यावेळी खैरे यांना दुहेरी सहानुभूती होती. एक तर प्रचारात खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे जाहीरपणे सांगितले. दुसरीकडे गेल्यावेळी केवळ साडेचार हजार मतांनी पराभव झाल्यामुळे एक संधी खैरै यांना दिली पाहिजे, असा मतप्रवाह असणारा आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असणारा मोठा मतदार यावेळी खैरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

Uddhav Thackeray- Eknath Shinde
Pune Yuva Sena News : लोकसभेच्या मतदानानंतर पुण्यात युवा सेनेमध्ये ना'राजीनामा' सत्र सुरू !

यात मराठा, (Maratha) ओबीसी, दलित, मुस्लिम व इतर अशा सगळ्याच मतदारांचा समावेश आहे. असे असले तरी बहुसंख्य मराठा आणि ओबीसी समाजाचा मतदार भुमरे-खैरे यांच्यापैकी कोणाच्या बाजूने अधिक झुकला यावर निवडणुकीचा निकाल आणि संसदेचा मार्ग कोणाचा प्रशस्त होतो हे अवलंबून असणार आहे. खैरेंसाठी जमेची बाजू म्हणजे अंबादास दानवे यांनी यावेळी पुर्ण जोर लावून प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. नेते पदी बढती झाल्यामुळे आपण राज्यभरात प्रचाराला फिरणार आहोत, असे दानवे यांनी सांगितले होते,

मात्र संभाजीनगरात सर्वाधिक वेळ त्यांनी लक्ष दिले. संदीपान भुमरे यांच्या दारू विक्रीचा व्यवसाय आणि टक्केवारीचा मुद्दा प्रचार सभामंधून उपस्थित करत खऱ्या अर्थाने त्यांनी निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष वेधण्यात यश मिळवले होते. शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाचीच संघटनात्मक बांधणी आणि बुध यंत्रणा कित्येक पटीने सक्षम होती. याचा फायदाही खैरे यांच्या मतांमध्ये वाढ होण्यात झाला आहे.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बनवायचे या हेतूने अनेक मतदारांनी इच्छा नसूनही खैरे यांच्या ऐवजी भूमरेंना मत दिल्याची चर्चा होती. या सगळ्या परिस्थितीत भुमरे आणि खैरे या दोघांमध्येच खरी लढत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संभाजीनगरचा खासदार शिवसेनेचाच होणार, पण तो बाळासाहेबांच्या की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Uddhav Thackeray- Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘या’ चौघांची केली प्रस्तावक म्हणून निवड; उमेदवारी अर्ज दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com