Sandip Kshirsagar-Vijaysingh Pandit : विजयसिंह पंडितांचा बीडमध्ये हस्तक्षेप वाढला, संदीप क्षीरसागरांचा पारा चढला!

Political News : बीड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राखला. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडीत यांचा बीडमध्ये वाढलेला हस्तक्षेप आमदार संदीप क्षीरसागर यांना खटकू लागला आहे.
Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Vijaysinha Pandit, Sandip KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed NCP Politics : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. पक्ष फुटल्यानंतरही बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर वगळता इतर सगळे नेते अजित पवारांच्या पाठीशी राहिले. माजलगांव, परळी, गेवराई या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. तर बीड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राखला. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडीत यांचा बीडमध्ये वाढलेला हस्तक्षेप आमदार संदीप क्षीरसागर यांना खटकू लागला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विकासकामांच्या पळवापळवीवरून पंडीत-क्षीरसागर यांच्यात संघर्षाचा भडका उडाला. गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड आणि गेवराईमधील 11 विकासकामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत बैठक आयोजित केली होती. या बैठकीलाच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी आक्षेप घेतला.

Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Maharashtra Politics Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

बीड मतदारसंघातील विकासकामांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी पंडित यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीपासून या दोन आमदारांमध्ये जुंपली आहे, आता दोघांमधील वाद अधिक चिघळताना दिसत आहे. बीड माझा मतदारसंघ आहे, इथे दुसऱ्या कोणाचा हस्तक्षेप सहन करणार नाही.

Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

दोन वेळा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे. विकासाच्या नावाखाली माझ्या मतदारसंघातील योजना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला तर मी त्याला विरोध करणारच, असे क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले. मला संघर्षाची सवय आहे. त्याशिवाय काम करण्यात मजा नाही. बीडच्या विकासाशी तडजोड होऊ देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे. क्षीरसागर यांच्या या इशाऱ्यानंतर आमदार विजयसिंह पंडीत (Vijaysinh Pandit) यांनी त्यांना 'बीडकरांचे माझ्यावर प्रेम वाढत आहे, त्याचा नेमका तुम्हाला त्रास होतोय का? असा टोला लगावत उत्तर दिले.

Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक ही गेवराई मतदारसंघातील विकासकामांसाठी होती. त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या काही प्रश्नांवर आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. माझं बीडवर प्रेम उतू जाण्यापूर्वी बीडकरांचे माझ्यावर प्रेम उतू गेले आहे. बीडकरांनी मला कौल दिला आहे. मग त्या प्रेमाचा काहींना त्रास का होतो? 'तुमचे कुटुंब गेली तीन दशके नगरपालिकेत सत्तेत होते. मग 165 कोटी रुपयांच्या योजनेचे काय झाले'? असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला.

Vijaysinha Pandit, Sandip Kshirsagar.
Maharashtra bypoll trends : कुठे माणुसकी जिंकली, तर कुठे राजकीय ईर्षा! महाराष्ट्रातील 12 वर्षांतील पोटनिवडणुकांचा 'ग्राफ' नेमका काय सांगतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com