Sanjay Bansode : संजय बनसोडे-संभाजी पाटलांत सौख्य वाढले; लातूरचे राजकीय गणित बदलणार?

Sambhaji Patil Nilangekar : देशाला प्रगतीकडे नेणारे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी.
Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Sambhaji Patil Nilangekar, Sanjay BansodeSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : राजकारणात कायम कुणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. याची प्रचीतीही गेल्या वर्ष-दीड वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींवरून आली. राज्याचे युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासारखा दुसरा नेताच नाही, असे म्हणत जणू षटकारच लगावला.

अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या प्राणपतिष्ठापनेनिमित्त निलंगा येथील निळकंठेश्वर मंदिरात राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. निलंगेकरांच्या आग्रहावरून मंत्री बनसोडेंनी रामकथेच्या समारोपाला हजेरी लावली. त्यानंतर निलंगेकर यांच्या निवासस्थानी बनसोडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामुळे भारावलेल्या संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी संभाजी पाटील-निलंगेकर यांचे कौतुक करीत जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. आता बनसोडे यांच्या या अचानक निलंगेकरांच्या प्रेमामागचे खरे कारण काय? हे लवकरच स्पष्ट होईल.

Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Eknath Shinde : लग्न एकाशी, संसार दुसऱ्याशी, हनिमून...; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर (Sambhaji Patil-Nilangekar) यांच्यासारखे नेतृत्व जिल्ह्यामध्ये दुसरे नाहीच. यामुळे भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीला भविष्यातील निवडणुका जिंकण्यासठी संभाजीराव यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

यावेळी शंभर कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, संभाजी पाटलांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी संजय बनसोडेंनी संभाजी पाटील-निलंगेकरांचे व त्यांच्या नेतृत्वाचे गुणगान केले. अयोध्येमध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. गावागावातही कथा, कीर्तन, प्रवचन, पालखी प्रदक्षिणा, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम उत्साहाने साजरे करण्यात आले.

Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Thackeray Vs Shinde : एकनाथ शिंदेंचा राजकीय वध करणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार

मीपण तुमचा मुलगाच...

अयोध्येतील राम मंदिर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळेच पूर्ण झाले. गेल्या पाचशे वर्षांपासून प्रत्येक नागरिकांची राम मंदिर उभारण्याची इच्छा व स्वप्न होते. ते नरेंद्र मोदी यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे. देशाला प्रगतीकडे नेणारे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी, असेही बनसोडे म्हणाले. अक्कासाहेब तुम्हाला संभाजीराव व अरविंदभय्या दोन सुपुत्र आहेत. मीपण तुमचा तिसरा पुत्र आहे. आता ते दोघे नाही तर आम्ही तिघे भाऊ, मीपण तुमचा मुलगा, असे म्हणत नाते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रूपाताई पाटील-निलंगेकर यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी बनसोडे यांना लाडू भरवत पुत्रवत प्रेमाची पावती दिली. अरविंद पाटील-निलंगेकर हे मॅनेजमेन्ट गुरू म्हणून संघटनेत अतिशय प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पूर्ण करून ती यशस्वी करीत असतात. परंतु अरविंद आता संघटनेतील काम तर होतच असतात, पण तुम्हाला लोकप्रतिनिधीच्या रूपात आम्हाला पाहायचे आहे. नवी जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनाही शुभेच्छा दिल्या. बनसोडे-निलंगेकर यांच्यातील हे प्रेम पाहून दोघांच्या समर्थकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसतील तर नवलच.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Sambhaji Patil Nilangekar, Sanjay Bansode
Uddhav Thackeray : 'राम की बात हो गई, अब काम की बात करो' : उद्धव ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com