Sanjay Dorve on Sudhakar Shringares defeat : 'जनतेशी संपर्क नसताना श्रृंगारेंना उमेदवारी, तिथेच..' ; संजय दोरवेंकडून भाजपला घरचा आहेर!

Latur BJP and Sudhakar Shringare जाणून घ्या, भाजपचे लातूर जिल्हा संघटन सरचिटणीस तथा माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी आणखी काय म्हटले आहे.
Sanjay Dorve on Sudhakar Shringare
Sanjay Dorve on Sudhakar ShringareSarakarnama

Latur Lok Sabha Constituency : लोकसभेचा निकाल लागून आता आठवडा होत आला आहे. परंतु पराभूत उमेदवारांचे मंथन आणि पक्षांतर्गत कुरबुरी अजूनही सुरूच आहेत. लोकसभेच्या लातूर मतदारसंघातून महायुतीचे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव झाल्यानंतर पक्षातंर्गत गटबाजी उफाळून आली आहे. जिल्ह्यातील नेत्यांमध्येच समन्वय नसल्याने लातूरमध्ये भाजपची हॅटट्रिक तर हुकलीच पण काँग्रेसला इथे कमबॅक करण्याची संधी मिळाली, असं बोललं जात आहे.

काँग्रेसने दिलेल्या नवख्या चेहऱ्याला मतदारांनी स्वीकारले, पण पाच वर्ष खासदार राहिलेल्या श्रृंगारे(Sudhakar Shringare) यांना मात्र नाकारले. जनतेशी पाच वर्ष संपर्क नसलेल्या सुधाकर श्रृंगारे यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली तिथेच भाजपचा पराभव झाला, असा घरचा आहेर भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस तथा माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी दिला आहे.

पाच वर्षाच्या कार्यकाळात जनतेच्या संपर्कात न राहिल्याने व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने लातूर लोकसभेच्या निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांचा पराभव झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. खासदार म्हणून पाच वर्षे सुधाकर शृंगारे यांनी लातूर(Latur) जिल्ह्यासाठी काय केले? किती विकास निधी आणला? असा प्रश्न जनतेतून वारंवार विचारला जात होता. असंही ते म्हणाले.

Sanjay Dorve on Sudhakar Shringare
Vidhan Parishad Election News : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक टांगणीला; 'हे' आहे कारण

याशिवाय 'कार्यकर्त्यांशी संपर्क न ठेवणारा उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दल पक्षात नाराजी होती. परंतु पक्ष श्रेष्ठीने पुन्हा सुधाकर शृंगारे याना उमेदवारी दिली. लातूर लोकसभेचे संयोजक माजी मंञी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी शृंगारे यांच्यासाठी जोर लावला. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाचा आदेश मानून कमळ हाच उमेदवार म्हणून जोमाने कामाला लागले.' असं दोरवेंनी सांगितलं.

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यासह वाडी, वस्ती दांड्यावर जावून सुधाकर शृंगारे यांचा प्रचार केला. परंतु मराठा आरक्षण, शेती मालाला भाव यावर असलेली नाराजी आणि उमेदवाराचा कमी असलेला संपर्क या सर्व बाबीमुळे शृंगारे यांचा पराभव झाला. याउलट काँग्रेसने डाॅ. शिवाजी काळगे यांच्यासारखा नवा व उच्चशिक्षित चेहरा दिला.

Sanjay Dorve on Sudhakar Shringare
Latur Lok Sabha Constituency : लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भंगारात टाकण्याची वेळ; नाना पटोले संतापले...

नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि काळगे 61 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. संभाजी पाटील निलंगेकर(Sambhaji Patil Nilangekar) यांनी या पराभवाला काँग्रेसने भाजप सत्तेवर आल्यास संविधान बदलणार असा अपप्रचार केला. तो रोखण्यात अपयशी ठरलो, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर असलेला रोष कमी करण्यात आम्हाला यश आले नाही, म्हणून लोकसभेला आमचा पराभव झाला याची कबुली याआधीच दिली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com