Sanjay Jadhav : काजू-बदामामुळे तोंड पोळलेले खासदार संजय जाधव ताकही फुंकून पिऊ लागले; माध्यमांना म्हणाले, ज्या विषयासाठी आलो, तेवढंच विचारा!

Nanded Cashew Almond Controversy: नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदाम प्रकरणानंतर खासदार संजय जाधव यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीवेळी त्यांनी संबंधित विषयांवरच प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.
Shivsena UBT MP sanjay jadhav
Shivsena UBT MP sanjay jadhavsarkarnama
Published on
Updated on

Cashew Almond Controversy : परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे नांदेड येथील दुष्काळाच्या शासकीय बैठकी काजू-बदाम खातांना दिसले आणि संपूर्ण राज्यात टीकेचे धनी बनले. माध्यमांवर संताप व्यक्त केल्यानंतर काजू-बदामामुळे तोंड पोळलेले खासदार संजय जाधव आता सावधगिरीने वागू लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले असताना माध्यमांनी त्यांना गराडा घातला. सुरुवातीलाच मी ज्या विषयासाठी इथे आलो आहे, तेवढंच विचार, उगाच भलतसलतं विचारू नका, असे त्यांनी सांगीतले.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत, यावर प्रश्न विचारला तेव्हा, याबद्दल मला काही माहित नाही, त्याचं मला कशाला विचारता? म्हणत त्यांनी पुन्हा त्रागा केल्याचे पहायला मिळाले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येत असल्याने आणि त्यांचे माझे नाते जिव्हाळ्याचे असल्यामुळे आपण त्यांची भेट घ्यायला आलो, असे जाधव यांनी सांगितले. माझ्या घरातील व्यक्ती जर आजारी असेल तर जाऊन भेटणे आणि त्यांची विचारपूस करणे माझे कर्तव्य आहे.

परभणीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या शेतकरी मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांचा विरोध असताना तुम्ही तो घेतला. यावरून जरांगे पाटील यांनी तुमच्यावर टीका केली याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर घरातल्या एखाद्या कर्त्या व्यक्तीला त्यांच्या माणसाला बोलायचा अधिकार असतो, त्यामुळे ते बोलले तर निश्चितच वाईट वाटण्याचे कारण नाही.

Shivsena UBT MP sanjay jadhav
Maharashtra Political Live Update : मराठवाड्याची कन्या म्हणून दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना अत्यंत अभिमान आणि आनंद : सुनेत्रा पवार

जरांगे पाटील ज्यावेळी बोलले तेव्हा त्यांची भावना वेगळी होती. मी समाजासाठी लढतोय आणि तुम्ही अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत आहात. त्यामुळे ते साहजिक होते. भाषण संपल्यानंतर मी शेवटी बोललो होतो, पाटलांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, याचाही जाधव यांनी आवर्जून उल्लेख केला.

उचलली जीभ लावली टाळूला

विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर केलेल्या आरोपाबाबत त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते शासनाकडे द्यायला पाहिजेत. त्यानंतर शासन त्याची शहानिशा करेल. आरोप करायला काय लागतं उचलली जीभ लावली टाळूला, असा टोलाही संजय जाधव यांनी लगावला. कोणतीही गोष्ट पुराव्या शिवाय सिद्ध होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

Shivsena UBT MP sanjay jadhav
Abdul Sattar News: मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र, भेटीनंतर अब्दुल सत्तार सहा कोटींच्या आरोपावरही स्पष्टच बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com