Sanjay Jadhav News : जानकरांना पराभवाची धूळ चारत तिसऱ्यांदा परभणी जिंकलेल्या संजय जाधवांचा 'हा' नवा रेकॉर्ड!

Parbhani Loksabha Election Result 2024 : परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी परभणी मतदारसंघात दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा गुलाल उधळला. नुसता विजय मिळवूनच ते थांबले नाहीत. तर त्यांनी...
Parbhani Lok Sabha Constituency
Parbhani Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : परभणी लोकसभा निवडणूक सर्वाधिक चर्चेत होती. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या आणि हॅट्ट्रिकच्या वाटेवर असलेल्या संजय जाधवांविरोधात शिवसेना शिंदे गट कोणाला उतवणार अशी चर्चा होती.पण महायुतीत ही जागा रासपच्या वाट्याला आली. तिथे महादेव जानकरांंना (Mahadev Jankar) जाधवांविरोधात उतरवण्यात आले. मात्र, संजय जाधवांनी जानकरांना 'पाहुणे'च ठेवत लोकसभेची निवडणूक दिमाखात जिंकली.

परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी या निवडणुकीत परभणी मतदारसंघात दणदणीत विजय मिळवत गुलाल उधळला. नुसता विजय मिळवूनच ते थांबले नाहीत. तर त्यांनी एक नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

मागील 67 वर्षांत 17 खासदार या जिल्ह्याने पाहिले. परंतू त्यामध्ये सलग तीनदा निवडून येण्याचा मान फक्त शिवाजीराव देशमुख यांच्यासह संजय जाधव यांना मिळाला आहे. त्यांचा हा विक्रम सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघ 1952 साली अस्तित्वात आला आहे. तेव्हापासून या मतदार संघाने 2024 पर्यंत 16 खासदार पाहिले आहेत. आजपर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून 11 जणांनी विजय संपादन केला आहे. यात कॉग्रेसचे शिवाजीराव देशमुख हे सर्वाधिक तीनवेळा खासदार राहिले होते. आता त्यांच्या बरोबरीने विद्यमान खासदार संजय जाधव यांनी बाजी मारली आहे. 2014, 2019 आणि आता 2024 या सलग तीन लोकसभा निवडणुकीत संजय जाधवांनी विजश्री खेचून आणली आहे. तर कॉग्रेस आयचे रामराव यादव लोणीकर, शिवसेनेचे प्रा. अशोक देशमुख, अॅड. सुरेश जाधव यांनी प्रत्येकी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे.

सन 1952 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे या मतदार संघावर वर्चस्व होते. त्यावेळी भाई नारायणराव वाघमारे हे या ठिकाणी पहिल्यांदा खासदार म्हणून विजयी झाले होते. भाई नारायणराव वाघमारे यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 1957 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा गड भेदत कॉंंग्रेसचे नागोराव पांगरकर यांनी या मतदार संघाची सुत्रे हाती घेतली. तेव्हापासून या मतदार संघात सलग 20 वर्ष कॉग्रेसचाच खासदार विजयी झालेला आहे. सन 1962 मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांनी या ठिकाणी विजय संपादन केला. 1962 ते 1977 असे सलग 15 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

Parbhani Lok Sabha Constituency
Sambhaji Patil Nilangekar : विरोधकांच्या अपप्रचारामुळे आमचा पराभव, निलंगेकरांनी सांगितली कारणं...

या मतदारसंघात मोठा कार्यकाळ काँग्रेसचे खासदार राहिल्याने या ठिकाणी 1977 मध्ये बदलाचे वारे वाहू लागले. त्यावेळी परत एकदा शेतकरी कामगार पक्षाचे शेषराव देशमुख (भाऊ) हे याठिकाणचे खासदार म्हणून विजयी झाले. परंतू त्यांचा कार्यकाळ फक्त तीन वर्षाचा होता. 1980 साली काँग्रेसचे रामराव यादव लोणीकर हे या ठिकाणी विजयी झाले. परत 1984 मध्ये रामराव लोणीकर हे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून खासदार झाले.

1989 मध्ये या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्चस्वाला छेद देत ज्वलंत हिंदूत्वाचा पुरस्कार करत शिवसेनेने पाऊल टाकले. शिवसेनेने शिक्षकी पेशात असलेले प्रा. अशोक देशमुख यांना या मतदार संघात संधी दिली. ते मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. परत 1991 लाही त्यांचा विजय झाला. परंतू ते नंतर काँग्रेसमध्ये गेल्याने शिवसेनेने 1996 मध्ये याठिकाणी अॅड.सुरेश जाधव यांना संधी दिली. ते देखील 1996 ते 1998 पर्यंत खासदार राहिले. 1998 ला कॉग्रेसचे सुरेश वरपुडकर हे या ठिकाणी विजयी झाले. नंतर 1999 या परत एकदा अॅड. सुरेश जाधव हे खासदार राहिले.

Parbhani Lok Sabha Constituency
Pankaja Gopinath Munde : संघर्षकन्याच ती! लोकनेत्याच्या लेकीचा संघर्ष काही केल्या संपेना

2004 मध्ये शिवसेनेकडून अॅड. तुकाराम रेंगे पाटील हे खासदार म्हणून विजयी झाले. 2009 मध्ये अॅड. गणेशराव दुधगावकर हे शिवसेनेचे खासदार म्हणून संसदेत पोहचले. तर 2014 मध्ये संजय जाधव हे शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. ते आजतागायत संजय जाधव हेच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Parbhani Lok Sabha Constituency
Lok Sabha Election Resullt 2024 : सत्ता आली पण... महाराष्ट्रातील तिघांसह मोदींच्या 18 मंत्र्यांना घरचा रस्ता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com