Sanjay Shirsat: पाचशे कोटींच्या प्रकरणाच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिल्यानं आमच्यासाठी प्रकरण संपलं! संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितले

Audio Clip Controversy: पाचशे कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात फॉरेन्सिक तपासानंतर सत्य समोर येईल, असे संजय शिरसाट म्हणाले. अवैध सावकारीवर कारवाई आणि रायगडमधील शिवसेना-राष्ट्रवादी वादावरही त्यांनी भूमिका मांडली.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News : पाचशे कोटी रूपयांच्या आरोपांचे ऑडिओ क्लीप प्रकरण आमच्या दृष्टीने संपले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात फाॅरेन्सीक लॅबमधून तपासणी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण किती दिवस चालवायचे? हा खरा प्रश्न आहे. एकदा तपास होऊ द्या, सोक्षमोक्ष लागू द्या, त्यानंतर यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर काय कारवाई करायची? याचा निर्णय होईल, असे राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

पाचशे कोटीचे प्रकरण आमच्या दृष्टीने संपले आहे. मुख्यमंत्र्यांनी फाॅरेन्सीक लॅबमध्ये तपासणी केली जाईल हे जाहीर केले आहे. त्याची तपासणी झाल्यानंतरच खरं काय खोटं काय? हे समोर येईल. म्हणून काही दिवस वाट पहावी लागेल. आता तेच प्रकरण किती दिवस चालवायंच हा खरा प्रश्न आहे. एकदा सोक्षमोक्ष होऊ द्या, तपास झाल्यानंतर यात कोण आरोपी आहेत? त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाईल, असे शिरसाट म्हणाले.

रामदास कदम यांनी "आपण पाचशे कोटी रूपयांच्या ऑडिओ क्लीप प्रकरण प्रखरतेने माध्यमांसोमर भूमिका मांडतोय, पण पक्षाचे इतर नेते तसे करताना दिसत नाही", असा घरचा आहेर माध्यमांशी बोलताना दिला. याबद्दल संजय शिरसाट यांना विचारले असता, रामदास कदम काय बोलले? हे मी पाहिले नाही. या प्रकरणावर रामदास कदम यांनी मांडलेल्या मुद्यांची दखल एकनाथ शिंदे व इतर सर्व नेत्यांनी घेतली आहे. त्यांच्या बाजूने कोणी नाही,असे म्हणणे चुकीचे आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्याबाबत आमच्या पक्षात कुठेलेही मतभेद नाहीत, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shirsat
Raigad Politics : शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पेटणार? कॅबिनेट मंत्र्याचा सुनील तटकरेंना इशारावजा सल्ला; शिंदेंकडेही तक्रार, 'तटकरेंना आवारा नायतर...'

सावकारी नाही, गुंडांच्या टोळ्या

मराठवाड्यात खासगी सावकारी आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जाचामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत असल्याच्या मुद्द्यावरही शिरसाट यांनी चिंता व्यक्त केली. “सावकारी पद्धत बंद झालीच पाहिजे. आता नव्याने निर्माण झालेले सावकार म्हणजे टोळ्या आहेत. बाऊन्सर नेमून पैसे घेतलेल्या व्यक्तींकडून २० टक्के दराने वसुली केली जाते. ही पद्धत थांबली पाहिजे,” असे ते म्हणाले.

"सावकार नाही,या गुंडांना आपण लायसन्स देतो की काय? असा संभ्रम निर्माण होत आहे.आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अशा सावकारीवर चाप बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कोणाचा वचक नाही. हा व्याजाचा धंदा आहे, या सगळ्या प्रकरणावर कॅबिनेटमध्ये चर्चा करून यांचे परवाने रद्द करा, अशी मागणी मी करणार आहे. मुख्यमंत्री यावर लवकरच ठोस निर्णय जाहीर करतील, असेही शिरसाट यांनी सांगीतले.

शिवसेना-राष्ट्रवादी वादावर इशारा

रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा उफाळला असून शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. “सुनील तटकरे यांच्याबाबतचा वाद रायगडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांना तुम्हीच आवरा. शिवसेनेचे आमदार आणि नेते भरत गोगावले वारंवार संयमाची भूमिका घेत आहेत. तटकरे यांनीही संयम बाळगावा. युतीत मिठाचा खडा पडेल, असे वागू नये. यापुढे वाद झाला, तर तो टोकाचा असेल,” असा इशारा शिरसाट यांनी दिला.

Sanjay Shirsat
Nashik Kumbh Mela : सिंहस्थाच्या आखाड्यात एकनाथ शिंदेंची एण्ट्री; १३ आखाड्यांतील साधू-महंतांच्या भोजनाची जबाबदारी घेतली

कर्जत परिसरातील प्रकल्पाला होत असलेल्या विरोधावरूनही शिरसाट यांनी टीका केली. "कर्जतच्या प्रकल्पाला विरोध करून काही लोक फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. आदित्य ठाकरेंचे कर्जतमध्ये फार्म हाऊस आहे, म्हणून तिथे जाता जाता एक दौरा करायचा आणि प्रकल्पाला विरोध करण्याचे नाटक ते करतील", असा टोला ठाकरे यांना लगावला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडीलांपर्यंत जाणं योग्य नाही, आई-वडिलांचा उद्धार करणं राजकीय समीकरणात बसत नाही, यातून काय संदेश जाईल, असे म्हणत शिरसाट यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com