

महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान जिन्सी भागात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला.
जलील यांनी या हल्ल्यासाठी संजय शिरसाट व अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले.
आरोपानंतर संजय शिरसाट यांनी “जैसी करणी वैसी भरणी” म्हणत जोरदार पलटवार केला.
Shivsena News : महापालिका निवडणूक प्रचारा दरम्यान, शहरातील जिन्सी भागात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर 25-30 जणांच्या जमावाने हल्ला चढवला. इम्तियाज यांना गाडीतून खेचण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. यावेळी झालेल्या झटापटीत एमआयएमचे काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. परंतु या हल्यानंतर इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेत हल्लेखोर हे त्यांनी पैसे देऊन पाठवलेले गुंड असल्याचा गंभीर आरोप केला. मंत्री अतुल सावे यांचेही इम्तियाज यांनी नाव घेतले.
यावर आता संजय शिरसाट यांनी 'जैसी करणी वैसी भरणी' म्हणत इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केला. इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेलिंग करण्यात तो माहिर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला ते याच्या जीवाला जीव देणारे होते. मात्र, याने पैसे घेवून तिकीट विकले, त्या संतापातूनच हा प्रकार घडला असावा. यातून जैसी करणी वैसी भरणी हे पहायला मिळाले.
'शेर आया शेर आया' म्हणणारा शेपूट घालून पळत आहे. आम्हाला पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही, ही त्याचीच पापे आहेत. मारहाण करणाऱ्यांना पोलीसांनी पकडले पाहीजे, त्यांना विचारले पाहीजे तुम्ही का असे केले?
मात्र, इम्तियाज जलीलला मस्ती आहे, तो आता रात्री भडक भाषण करून सर्व मुस्लिम माझ्यासोबत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करेल. उमेदवारी कापलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी त्याला दिलेले हे प्रत्युत्तर असल्याचा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
माझ्यावर हल्ले करणारे हे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे गुंड आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या लोकांना त्यांच्याकडून पैसे घेऊन काम केले होते, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
ज्यांनी हल्ला केला ते कधीच एमआयएम पक्षाचे नव्हते आणि आजही नाहीत. हल्लेखोर हे सावे, शिरसाट यांचे किरायाचे ट्ट्टू आहेत. त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता.
1. इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला कुठे झाला?
→ शहरातील जिन्सी भागात प्रचारादरम्यान हा हल्ला झाला.
2. हल्ल्यात किती लोक सहभागी होते?
→ अंदाजे 25 ते 30 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती आहे.
3. इम्तियाज जलील यांनी कोणावर आरोप केले?
→ पालकमंत्री संजय शिरसाट व मंत्री अतुल सावे यांच्यावर त्यांनी आरोप केले.
4. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया काय होती?
→ “जैसी करणी वैसी भरणी” असे म्हणत त्यांनी जलील यांच्यावर पलटवार केला.
5. या घटनेचा निवडणूक वातावरणावर काय परिणाम होतोय?
→ शहरात राजकीय तणाव वाढला असून प्रचारादरम्यान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.