Shivsena Sanjay Shirsat News: महापालिका निवडणुकीत आमची लढाई एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शेवटच्या क्षणाला शिवसेना-भाजपची युती तुटली. भाजपने अंहकार आणि हट्टापायी युती तोडल्याचा आरोप शिरसाट यांनी केला होता. परंतु निवडणुकीत मात्र शिवसेना भाजपला नव्हे, तर एमआयएम आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच प्रमुख विरोधक मानत असल्याचे शिरसाट यांनी सांगून टाकले.
शिवसेनेची लढाई एमआयएम सोबत असेल, हिंदूत्ववादी भूमिका प्रचारात आणा. उबाठा गटाच्या मुस्लिमधार्जीण भूमिका लोकांसमोर न्या, अशा सूचना संजय शिरसाट यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात संजय शिरसाट यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तणवाणी यांची यावेळी उपस्थिती होती.
एमआयएम हा जातीयवादी पक्ष आहे. हैदराबादचे नबाब इथे येवून इथल्या मुस्लिमांची माथी भडकवण्याचे कामे करतील. प्रसंगी हे लोक दंगल घडवतील, हल्ला करतील. त्यांना जातीवादाशिवाय हिंदू- मुस्लिम केल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाहीत. त्यामुळे उत्तराला प्रतिउत्तर द्यावे लागेल, ही भूमिका आम्ही घेतली तर त्यात गैर काही नाही. शहर शांत आहे, इथली शांतता बिघडवण्याचे काम करू नका असे आवाहन करतानाच पोलीसांनीही याची काळजी घ्यावी, असे शिरसाट म्हणाले.उबाठा मामूनेही ही विषवल्ली घरात घेतल्यामुळे हे घडतेय, असेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांचीही एन्ट्री होणार आहे. उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन कसे असेल याबद्दलही यावेळी चर्चा झाली. तसेच अडचणीही विचारण्यात आल्या. त्यात आमदार अब्दुल सत्तार यांनाही प्रचारासाठी बोलवा, अशा सुचनाही यावेळी हर्सुल प्रभागातील पदाधिकाऱ्यांने केली. त्यानंतर प्रदीप जैस्वाल यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठकही घेतली.
प्रभागात पॅनल आहेत, त्यात दगा फटका करू नका असा इशारा देतांनाच चोर पंम्पचर, लिकेज राहू देवू नका. त्या होलमधून तूच वाहून जाशील असा इशार शिरसाट यांनी दिला. तसेच पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची नावे कळवा त्यांची हकालपट्टीही करण्यात येईल, असेही असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. ओवेसी कशासाठी हैदराबाद वरून इथे येत आहे तर ते जातीवाद पेरण्यासाठी येत आहेत. तुम्हाला यायचं तर या परंतु शहराची शांतता बिघडण्यासाठी कोणते ही काम करू नका. उबाठा मामुने देखील बारा मामू उभे केले आहेत. आमचा सगळ्यात मोठा स्पर्धक एमआयएम आहे. त्यानंतर उबाठा मामुची टीम आमची विरोधक असेल, उबाठा देखील एमआयएमची बी टीम झाल्याची टीका संजय शिरसाट यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.