CIDCO : संजय शिरसाटांना अध्यक्षपदावरून हटवताच 'सिडको'चा अर्जदारांना मोठा धक्का, 26,000 घरांच्या किंमती 'जैसे थे'

CIDCO 26,000 homes prices : एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आमदार संजय शिरसाट यांना राज्य सरकारने सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवलं. हा शिरसाटांना मोठा धक्का होता. तर शिरसाट यांना अध्यक्षपदावरून हटवताच सिडकोने अर्जदारांना मोठा धक्का दिला आहे.
Sanjay Shirsat CIDCO
Sanjay Shirsat CIDCOSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 18 Jan : एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) शिलेदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आमदार संजय शिरसाट यांना राज्य सरकारने सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवलं. हा शिरसाटांसाठी मोठा धक्का होता. तर शिरसाट यांना अध्यक्षपदावरून हटवताच सिडकोने अर्जदारांना मोठा धक्का दिला आहे.

कारण सिडकोने जाहीर केलेल्या 26000 घरांच्या किंमती जाहीर झाल्यानंतर अर्जदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या घरांच्या किमती जास्त असल्याचं अर्जदारांचं म्हणणं होतं. त्यानंतर, सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट (Shirsat Shirsat) यांनी या घरांच्या किंमती कमी करण्यात येतील, असं आश्वसन दिलं होतं.

Sanjay Shirsat CIDCO
Dada Bhuse : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा; राज्यात दोन टप्प्यांत ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करणार

मात्र, शिरसाट यांना सिडकोच्या (CIDCO) अध्यक्षपदावरुन हटवताच सिकडोकडून घरांच्या किंमती जैसे थे राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सिडकोच्या घरासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. सिडकोने 'माझे पसंतीचे घर' या योजनेअंतर्गत 26 हजारे घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

मात्र, या घरांच्या किमती सास्त असून त्या कमी करण्याबाबत प्रयत्न करू, असं आश्वासन सिडकोचे माजी अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं होतं. अशातच आता जाहीर केलेले दर कमी करणार नसल्याचे संकेत सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी दिले आहेत. ते म्हणाले, सिडकोने घरांच्या किमती रेडीरेकनर नुसार ठरवल्या आहेत.

Sanjay Shirsat CIDCO
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारीचा कहर! महिला सरपंचाला देखील सोडलं नाही, खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

या घरांमध्ये अत्याधुनिक सुविधा देत असल्यामुळे त्यांच्या किंमती योग्य आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या (CIDCO) अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता सिडकोचं अध्यक्षपद कुणाला मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवाय हे अध्यक्षपद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार महायुतीतील (Mahayuti) इतर मित्रपक्षांकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com