Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार पीडितीनं वसंत मोरेंना सांगितली आपबिती; म्हणाली, तात्या मला वाचवा!

Thackeray Group leaders Vasant More meets victim: ती मुलगी म्हणाली बलात्काराच्या घटनेनंतर ससून रुग्णालयामध्ये तिने महिला डॉक्टरच्या माध्यमातून तपासणी व्हावी, ही मागणी केली होती मात्र तसं झालं नाही.
Vasant More meets victim
Vasant More meets victimSarkatnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यामध्ये स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर संबंध महाराष्ट्र हादरून केला. हा प्रकार घडल्यानंतर ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये जात सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली. यानंतर आता पीडित तरुणीने आपल्या मित्राच्या माध्यमातून वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला. वसंत मोरे यांनी त्या पिडित तरुणीची भेट घेतली असल्याचं मोरे यांनी सांगितले.

मोरे म्हणाले, "पीडितेच्या मित्रांनी माझ्याशी संपर्क साधून मला भेटायचं असल्याचं कळवलं. त्यावेळेस मी बारामती येथे होतो. त्यामुळे तो तरुण चार ते पाच तास माझ्या ऑफिसला बसून होता. त्यानंतर माझी त्यांची भेट झाली. त्याने त्या मुलीशी बोलणं करून दिलं. त्यावेळेस ही मुलगी मला म्हणाली, "तात्या मला वाचवा मी फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवू शकतो. खूप जण मला काही काही विचारत आहे. मी सगळ्यांना सांगून वैतागले आहेत,"

त्यानंतर रविवारी आम्ही त्या मुलीला भेटायला गेलो त्या मुलीने या भेटीदरम्यान काही गोष्टींचा खुलासा केले आहेत. ती मुलगी म्हणाली बलात्काराच्या घटनेनंतर ससून रुग्णालयामध्ये तिने महिला डॉक्टरच्या माध्यमातून तपासणी व्हावी, ही मागणी केली होती मात्र तसं झालं नाही. त्याबाबतीत रुग्णालयाने तिला सहकार्य केलं नाही.

Vasant More meets victim
Dattatraya Gade: लेडी ब्लॅकमेलर दत्ता गाडे; लॉजबाहेर बसून असं शोधायचा सावज, महिलांचे छुपे व्हिडिओ काढून...

नंतर तिच्यावर बलात्कार संमतीने झाल्याचा आरोप झाला.यामध्ये पैशांची देवाण-घेवाण झाल्याचाही आरोप झाला. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिने तिला आत्महत्या करावीशी वाटतं, असे देखील सांगितलं. त्यामुळे मी तिला सोशल मीडियावर या गोष्टी न पाहण्याचा सल्ला दिला, असे मोरे म्हणाले.

याबाबत बोलताना तिने सांगितलं की त्या आरोपींनी धमकावून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी माझ्यासमोर कोलकत्तामध्ये रेप प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीने तरुणीला मारून टाकलं होतं तो प्रसंग समोर आला. माझ्या मागे माझं कुटुंब असल्याने मी त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या.

त्यानंतर आरोपी पाठीमागे मी बाहेर पडल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी एक ड्रायव्हर आणि कंडक्टरला याबाबत कल्पना दिली. तेव्हा तो आरोपी तिथून जात होता त्या दोघांनी त्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पळून गेला. त्यानंतर त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने मला हे सगळं सोडून देण्याचं सल्ला दिला .त्यामुळे मी पुढची बस पकडून घरी निघाले होते, असं त्या मुलीने सांगितलं. त्यामुळे आता या सर्व प्रकरणांमध्ये आम्ही त्या मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com