Walmik Karad Video : "...तोपर्यंत मी उठणार नाही" वाल्मिक कराडची पाठराखण करण्यासाठी 75 वर्षाच्या आईचं ठिय्या आंदोलन, म्हणाली...

Walmik Karad Mother Parubai Karad Protest : वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा नव्हे तर हत्येचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी (ता.14) संतोष देशमुख यांच्या भावाने आक्रमक भूमिका घेत स्वत:ला संपवून घेण्याचा इशारा देत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होत.
Walmik karad
Walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Beed News, 14 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराडच असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियासह विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून होत आहे.

तर वाल्मिक कराडवर (Walmik Karad) केवळ खंडणीचा नव्हे तर हत्येचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी (ता.14) संतोष देशमुख यांच्या भावाने आक्रमक भूमिका घेत स्वत:ला संपवून घेण्याचा इशारा देत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होत.

त्यानंतर लगेचच जुनी सीआयडी (CID) बरखास्त करून नवी सीआयडी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, एकीकडे आज खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज संपत असल्यामुळे त्याला केज येथील सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Walmik karad
Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या भावाने टोकाची भूमिका घेताच CID ने उचललं मोठं पाऊल, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

तर दुसरीडके, असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड (वय.75) या परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. माझा मुलगा निर्दोष असून त्याला सोडा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तरर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या पारुबाई कराड यांनी माध्यमांशी बोलातना माझ्या लेकाने काहीही केलं नसल्याचं म्हटलं आहे.

Walmik karad
Beed News : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तापलेल्या बीडबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, आज मध्यरात्रीपासून...

त्या म्हणाल्या, "माझ्या लेकाने काहीही केलेलं नाही. त्याच्यासाठी मी जीव द्यायला तयार असून या ठिकाणाहून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय वाल्मिक कराडवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाहीत तोपर्यंत मी हलणार नाही"; अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com