Pune Congress : कोल्हापूरचा पैलवान पुण्यात डाव टाकणार ! काँग्रेस शहराध्यक्षांसह संघटनात्मक मोठे बदल होणार ?

Kolhapur wrestler Pune politics News : पहिल्या टप्प्यात राज्य पातळीवरील कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर पुढील महिन्याभरामध्ये शहर आणि जिल्हा पातळीवरील काँग्रेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून मिळत आहेत.
Congress
Congresssarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हातात घेतल्यानंतर आता राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक उलथापालथ पाहायला मिळणार आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये राज्यातील नवी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्य पातळीवरील कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर पुढील महिन्याभरामध्ये शहर आणि जिल्हा पातळीवरील काँग्रेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) चांगले यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. यानंतर सध्या महाराष्ट्र काँग्रेस एका स्थितांतराच्या फेजमधून जात आहे. विधानसभेच्या पराभवानंतर केंद्रातल्या पक्ष श्रेष्ठींनी राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नाना पटोले यांच्याकडून काढून घेऊन ती हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केली.

Congress
Sharad Pawar Solapur Tour : शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द; हे आहे कारण

हर्षवर्धन सपकाळदेखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागले आहेत. कमी काळामध्ये काँग्रेसच्या संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नवी टीम तयार करण्याच्या कामगारीत सध्या हर्षवर्धन सपकाळ असल्याचे पाहायला मिळत आहे.

Congress
BJP Maharashtra : भाजपमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर! मुनगंटीवारांना पुन्हा जड जातोय त्यांचाच पठ्ठ्या, सुरू झाला वादाचा नवा अंक

हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal ) यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एका निरीक्षकाची नेमणूक केली आहे. सध्या हे काँग्रेसचे निरीक्षक स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते, आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. या चर्चे अंती हे निरीक्षक प्रत्येक शहराचा जिल्ह्याचा अहवाल तयार करून तो प्रदेशाध्यक्षांना सोपवणार आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगानेच आगामी काळात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.

Congress
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना रायगडावर मानाचे पान; शेवटच्या क्षणी दिली भाषणाची संधी तर अजितदादांना मात्र...

निरीक्षक म्हणून पुण्याची जबाबदारी कोल्हापूरमधील काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सतेज पाटील यांनी नुकतंच पुण्यात येत विविध बैठका घेत कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी चर्चा केली आहे. बैठकादरम्यान अनेक नेत्यांनी संघटनात्मक बदल सुचवले आहेत. काँग्रेसमध्ये शहरातील विविध भागांसाठी ब्लॉक अध्यक्ष नेमण्यात येतो. शहरात सध्या 5 ब्लॉक अध्यक्ष आहेत. मात्र पुणे शहराचा विस्तार वाढत गेला असला तरी ही ब्लॉक अध्यक्षांची संख्या तशीच राहिली आहे. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे किमान विधानसभा मतदारसंघनिहाय ब्लॉक अध्यक्ष असावा अशी मागणी सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Congress
Sudhir Mungantiwar Funny Speech : '...तर अर्ध्या आमदारांच्या बायका या हिरोईनी असत्या', सुधीर मुनगंटीवारांनी सांगितला 'तो' किस्सा

शहराध्यक्ष बदलासाठी शहरातील अनेक नेते आग्रही ?

लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यात काँग्रेसला यश मिळवता आले नाही. त्यामुळे संघटनात्मक मोठे फेरबदल करत संघटनेत तरुणांना अधिकाधिक संधी द्यावी आणि शहराध्यक्ष देखील बदलावा, अशी मागणी अनेकांनी बंटी पाटील यांच्याकडे केली. गेल्या काही काळापासून पुण्यातील काँग्रेसचा एक गट शहराध्यक्ष बदलावा यासाठी आग्रही आहे. या गटातील नेत्यांनी सतेज पाटील यांच्या बैठकीची संधी साधत शहराध्यक्ष बदलाबाबत मोठी फिल्डिंग लावल्याचे देखील पाहायला मिळालं अनेकांनी शहराध्यक्ष बदलाची मागणी थेटपणे सतेज पाटील यांच्याकडे केली.

Congress
NCP SP On Nitesh Rane : नीतेश राणेंनी केलेले स्टेटमेंट ही सरकारची भूमिका आहे का? : पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल

त्यासोबतच काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष बदलाबाबत निवेदन देखील दिली असल्याचं सांगितलं जात आहे.या झालेल्या बैठकीनंतर बंटी पाटील यांनी घेतलेल्या आढाव्या बाबत अहवाल तयार करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुढील आठवड्यामध्ये सतेज पाटील आणखी एक बैठक घेणार आहेत. यानंतरच पाटील यांच्या या अहवालाला अंतिम स्वरूप येणार आहे.

Congress
Ashish Shelar : रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अमित शाह नाहीतर यांच्या अखत्यारितला? आशिष शेलारांनी थेट नावच सांगितलं

सध्याची परिस्थिती पाहिल्यास काँग्रेसमधील विविध गट बंटी पाटील हे संघटनात्मक बदलासाठी सकारात्मक असल्याचे सांगत आहेत. तसेच काँग्रेसमधील काही गट आतापासूनच संघटनात्मक बदलाबाबत वेगवेगळे दावे करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे पैलवान म्हणून ओळख असलेले सतेज उर्फ बंटी पाटील नेमका कोणता डाव टाकणार आणि त्यामधे काँग्रेसचा कोणता गट चितपट होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Congress
Manikrao Kokate : मंत्री कोकाटे यांनी थेट सुनावले; भुजबळांना पोटदुखी का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com