Sarangi Mahajan : धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या सारंगी महाजनांना उत्तर, गोविंद मुंडे म्हणाला, 'या प्रकरणाशी...'

Sarangi Mahajan Land Grab Allegations : सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धाक दाखवून आपली जमीनीचा व्यवहार केला आणि कोट्यावधीची जमीन अवघ्या 21 लाखांना खरेदी केल्याचा आरोप केला आहे.
Pankaja Munde | Dhananjay  Munde | Sarangi Mahajan
Pankaja Munde | Dhananjay Munde | Sarangi MahajanSarkarnama
Published on
Updated on

Beed News : सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धाक दाखवून आपली जमीनीचा व्यवहार केला आणि कोट्यावधीची जमीन अवघ्या 21 लाखांना खरेदी केली. धनंजय मुंडे यांच्यासोबत सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आरोपांना अजून उत्तर दिले नसताना जमीन खरेदी केलेले गोविंद मुंडे यांनी सारंगी महाजन यांचे आरोप खोडून काढले आहेत. सारंगी महाजन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नात्याने मामी लागतात.

गोविंद मुंडे म्हणाले, सारंगीताई महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीने झालेला असून, खरेदीखत रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम देखील दिलेली आहे. सारंगीताई या सुशिक्षित असून, कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात? त्यांनीं केलेले आरोप बिनबुडाचे व चुकीचे आहेत.

Pankaja Munde | Dhananjay  Munde | Sarangi Mahajan
Prakash Ambedkar : ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, केल्या 'या' मागण्या

'संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहे. हा व्यवहार सारंगीताई व माझ्यात झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचा दुरान्वये कसलाही संबंध नाही', असेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

'हा व्यवहार दोन वर्षांपूर्वी झालेला असून, आता दोन महिन्यांपूर्वी सारंगी महाजन यांनी या विषयी कोर्टात दावा दाखल केला आहे. त्याविरुद्ध आपण आव्हान याचिका दाखल केली असल्याचेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण जेवणासह सारंगी महाजन यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांना स्वतःच्या गाडीतून मुंबईला सोडवले होते. सारंगी महाजन यांनी दिलेला दावा व त्याविरुद्ध मी केलेले आव्हान हे न्यायप्रविष्ट आहे. सारंगीताई यांनी विनाकारण या धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचे या व्यवहाराशी कसलाही संबंध नसताना त्यांचे नाव जोडून चुकीचे व बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही गोविंद मुंडे म्हणालेत.

सारंगी यांचा नेमका आरोप काय?

धनंजय मुंडे यांनी माझी जिरेवाडीतील तीन कोटींची जमीन हडपली. यामध्ये पंकजा मुंडे यांचाही हात आहे. धनंजय मुंडे यांच्या घरातील नोकराच्या नावावर ही जमीन आहे. कोऱ्या बाॅन्ड पेपरवर धमकावून माझ्या सह्या घेण्यात आल्या होत्या. सह्या केल्या नाही तर परळीतून बाहेर जाऊ देणार नाही, असा दम देऊन सह्या घेतलेल्या बाँडच्या आधारे या जमीनीची रजिस्ट्री धनंजय मुंडे यांच्या माणसांनी करून घेतली, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.

Pankaja Munde | Dhananjay  Munde | Sarangi Mahajan
Pritish Nandy passes away : माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com