Pritish Nandy passes away : माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन

Former MP Pritish Nandy News : पत्रकार, सिने निर्माते, माजी खासदार प्रितीश नंदी यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते.
Pritish Nandy
Pritish Nandy Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पत्रकार, सिने निर्माते, माजी खासदार प्रितीश नंदी यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यांनी पत्रकारितेत मोठे करियर केले होते. त्यासोबतच अनेक पुस्तकांचे लेखक तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही भूषविले होते.

कवी, लेखक, पत्रकार अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्रितीश नंदी (Pritish Nandy) यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. प्रितीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियातून अभिनेते अनुपम खेर यांनी दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट टाकत प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Pritish Nandy
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

प्रितीश नंदी हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. शिवसेनेच्या (Shivsena) कोट्यातून राज्यसभेवर ते निवडून आले होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले आहे. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

Pritish Nandy
Pune Former corporators join BJP : पुण्यातील माजी नगरसेवकांनी 'या' कारणांमुळे शिंदेंचा पर्याय झुगारून धरली भाजपाची वाट

प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स या बॅनरखाली त्यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीस सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली, हजारों ख्वैशीं ऐसी, प्यार के साईड इफेक्ट्स यांसारख्या चित्रपटांसह ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या कंपनीने अलीकडेच फोर मोअर शॉट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई या काव्यसंग्रह मालिकेची निर्मिती केली. त्यांनी १९९० च्या दशकात दूरदर्शनवरील ‘प्रितिश नंदी शो’ नावाचा टॉक शो देखील होस्ट केला होता.

Pritish Nandy
Pune Politics : "गेले 5 वर्ष भाजपनेत्यांवर..." ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेशच होताच भाजपमधील खदखद चव्हाट्यावर

प्रितिश नंदी यांच्या निधनाने मला दुःख होत आहे आणि हे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला. एक अद्भूत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार आपण गमावला आहे. माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या उमेदीच्या काळात माझे प्रेरणा एक मोठा स्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत, असे ट्विट करीत अभिनेते अनुपम खेर यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

Pritish Nandy
Pune Corporators : महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देणारे कोण आहेत पाच नगरसेवक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com