Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला अटक, उज्वल निकमांची नियुक्ती अन् धनंजय मुंडे सहआरोपी..., मस्साजोगमधून जरांगेंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन

Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा, यासाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dhananjay Munde ,Manoj Jarange Patil, Krishna Andhale, Santosh Deshmukh
Dhananjay Munde ,Manoj Jarange Patil, Krishna Andhale, Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 21 Feb : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा, यासाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मस्साजोग इथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करत ग्रामस्थांच्या भावना त्यांना सांगितल्या.

Dhananjay Munde ,Manoj Jarange Patil, Krishna Andhale, Santosh Deshmukh
Manikrao Kokate : सुनील केदारांना अपात्र करण्यात जी तत्परता दाखवली, तीच आता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कोकाटेंबाबत दाखवणार का..?

फोनवर चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवल्याचं पाटील यांनी सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले, मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत. हा खूप संवेदनशील विषय आहे. राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलिस अधिकाऱ्यांना देखील सहआरोपी करा.

फरार कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करावी. बाकीच्या आरोपींचा सीडीआर काढण्यात यावा अशा प्रमुख मागण्या देशमुख कुटुंबाच्या आणि ग्रामस्थांच्या मागण्या आहेत, असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.

Dhananjay Munde ,Manoj Jarange Patil, Krishna Andhale, Santosh Deshmukh
Prakash Ambedkar News : जरांगेंना कंट्रोल करण्यासाठी भाजपाचा प्लॅन, आता धसांचाच पत्ता कट! प्रकाश आंबेडकरांचा आरोप

शिवाय यावेळी त्यांनी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली. त्या पोलिस अधिकाऱ्याला सहआरोपी केलं नाही. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना देखील सहआरोपी करा त्यांनीच हे आंदोलन दडपलं होतं.

तसंच पोलिसांकडून कारवाई होत नसून चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता असून धनंजय मुंडे देखील यात आहेत, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. शिवाय मुंडेंना टोळ्या सांभाळण्याचा नाद असून यातील आरोपी त्यांचेच आहेत, त्यामुळं त्यांना देखील सह आरोपी करा अशी मागणी जरांगे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com