Prakash Ambedkar News : जरांगेंना कंट्रोल करण्यासाठी भाजपाचा प्लॅन, आता धसांचाच पत्ता कट! प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Manoj Jarange Patil News Santosh Deshmukh Murder Case BJP MLA Suresh Dhas : ज्यांनी या प्रकरणासंदर्भात आंदोलने केली, त्यांनी ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आऱोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
prakash ambedkar, suresh dhas, manoj jarange
prakash ambedkar, suresh dhas, manoj jarangeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. या प्रकरणांमध्ये रोज नवनवे घटनाक्रम समोर येत आहेत. बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी दोनदा गुप्त भेट घेतली असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतले आहे. या भेटीनंतर विरोधकांकडून धस यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणांमध्ये वेगळाच कट झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बीड प्रकरणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, संतोष देशमुख यांचे कुटुंब मला भेटायला आलं होतं. तेव्हा मी विचारलं होतं की तुम्ही FIR दाखल केला आहे का? तर त्यांनी तक्रार केली नव्हती. मी त्यांना सल्ला दिला की, तुम्हाला जे जे आरोपी वाटत आहे. त्या संदर्भात तुम्ही एफ आय आर  दाखल करा त्यानंतर मग त्यांनी FIR दाखल केला आहे.

prakash ambedkar, suresh dhas, manoj jarange
Pune : मारणे टोळीची दादागिरी; मंत्री मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍याला बेदम मारहाण

FIR मधली संशयित आरोपींची नावे पुढे आल्याशिवाय कायदेशीर कारवाई करता येत नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबाचा FIR महत्वाचा आहे. मात्र माझा असा आरोप आहे की, ज्यांनी या प्रकरणासंदर्भात आंदोलने केली, त्यांनी ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आऱोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या गुप्त भेटीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांना पुढे करण्यात आले त्यानंतर आता भाजपने धसांचाच पत्ता कापला असल्याचं समोर आलं आहे.

prakash ambedkar, suresh dhas, manoj jarange
Chitra Wagh Vs Swara Bhaskar: स्वराची 'छावा'वर कमेंट अन् चित्रा वाघांची तळपायाची आग मस्तकात गेली; म्हणाल्या,' तुमच्यासारख्या मुर्दाड...'

घोटाळ्यासह इतर प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा सातत्याने मागितला जात आहे. मात्र आरोप सिद्ध झाले तर मुंडेंनी राजीनामा दिला तर योग्य होईल. तसेच अंजली दमानिया यांनी त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते कोर्टात सादर करावे, असे देखील आंबेडकर म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये दोघांमध्ये घमासान सुरू आहे. यात दुमत नाही. कुरघोडी करायचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हे कुठपर्यंत चालेल ते सांगता येत नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com