Shivsena UBT : 'शिवडी' वरून प्रचंड वाद, ठाकरेंनी साळवी नव्हे तर चौधरींनाच का दिलं तिकीट? 'हा' ठरला 'प्लसपॉइंट'

Shivadi Assembly constituency: शिवडी मतदारसंघातील उमेदवारीवरून वाद सुरु असल्याने याठिकाणाचा उमेदवार बुधवारी जाहीर करण्यात आला नव्हता.
Sudhir Salavi, Uddhav Thackeray, Ajay Choudhri
Sudhir Salavi, Uddhav Thackeray, Ajay Choudhri Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकासाठी दोन दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आघाडी घेत 64 उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिवडी मतदारसंघातील उमेदवारीवरून वाद सुरु असल्याने याठिकाणाचा उमेदवार बुधवारी जाहीर करण्यात आला नव्हता.

मातोश्रीवर गुरुवारी या जागेसंदर्भात शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये येथील विद्यमान आमदार अजय चौधरी (Ajay Choudhri) व शिवसेनेचे नेते सुधीर साळवी यांच्यात या जागेवरून वाद झाला होता. त्यामुळेच यादी जाहिर झाली तरी या ठिकाणचा उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. त्याविषयावर गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या नावावर एकमत झाले.

सर्वच नेत्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) संकट काळात आमदार अजय चौधरी हे पक्षासोबत निष्ठेने राहिल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने बक्षिसी म्हणून शिवडी मतदारसंघातून आमदार अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवी यांना मात्र या निर्णयामुळे उमेदवारी मिळाली नाही. त्यांना पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागणार आहे.

Sudhir Salavi, Uddhav Thackeray, Ajay Choudhri
MVA Meeting : महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला जाहीर, प्रत्येक पक्षाला 85 जागा...

दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाच्या या पहिल्या यादीत चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून बुधवारी जाहीर केलेल्या यादीत विद्यमान 16 आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच चार महिला रणरागिनींना मैदानात उतरवले आहे.

Sudhir Salavi, Uddhav Thackeray, Ajay Choudhri
Mahayuti News : जागेच्या अदलाबदली ऐवजी महायुतीने पाठवले 'या' जागेवरील उमेदवारच दुसऱ्या पक्षात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com