Hatgaon News : सरकार विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहे. मात्र या निधीचा वापर योग्यरित्य होतोय की नाही याच्यावर कोण लक्ष ठेवणार, असा संतप्त सवाल नांदेड जिल्ह्यात हदगावमधील हस्तरा येथे उपस्थित केला जातो आहे. कारण अंगणवाडीच्या कामासाठी तब्बल 12 लाख रुपयांच्या निधीतून केलेल्या कामाची पोलखोल गावातील तरुण शरद कांबळे यांनी केली आहे.
शरद कांबळे यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्यामध्ये हस्तरा येथे अंगणवाडी क्रमांक दोनमध्ये 12 लाख रुपये खर्च करून किती निकृष्ट काम केले आहे याचा थेट पुराव दिला. अंगणवाडीला प्लास्टर केले आहे. मात्र, एका साध्या लोखंडी सळईने हा प्लास्टरला टच केले असता ते प्लॅस्टर निघत असल्याचे दिसते आहे.
12 लाख रुपये खर्च करून या अंगणवाडीत ना पिण्याची पाण्याची टाकी बांधण्यात आलीये ना पंखा किंवा लाईटची काही सुविधा करण्यात आली आहे. या निकृष्ट बांधकामात चिमुकली मुलं उद्या शिक्षण घेणार आहेत त्यामुळे त्याच्या सुरक्षतेला धोका निर्माण होईल, अशी भीती देखील शरद यांनी व्यक्त केली आहे.
शरद यांनी सांगितले की, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा, सी. सी. नाली बांधकाम, यामधील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार करून थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही कामे कागदोपत्रीच दाखवूनही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या सर्व कामांची चौकशी करून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
काही कामे कागदोपत्रीच दाखवूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. दलित वस्ती सुधाण्यासाठी खर्च करायचा 15% निधीही खर्च केला नाही. तसेच दलित वस्तीत पेव्हार ब्लॉक बसविल्याचे खोटी कागदपत्र दाखवून तब्बल एक लाखाचे बिल देखील मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप, कांबळे यांनी केला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुढाकारने ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती हदगांव यांना निवेदन देण्यात आले आहे. जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भाऊसाहेब देशमुख यांच्यासह शरद कांबळे, धनंजय सोळंके, ओमकार सोळंके, जोकेर अनसार, युवराज उमरे, बाळासाहेब वानखेडे, युवराज उमरे आदींच्या स्वाक्षरी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.