Ajit Pawar: 'द अजित पवार' बायोपिकमध्ये अभिनेता कोण? दादांनी सांगितलं होतं नाव; ....तेव्हापासून हा शब्द कमी वापरतोय!

Who Is the Actor in ‘The Ajit Pawar’ Biopic:  चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अजितदादांची मुलाखत झाली होती. यातील व्हिडिओ क्लिप आहे. अभिनेते अवधूत गुप्ते यांनी दादांना 'द अजित पवार' नावाचा बायोपिक आला तर यात तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी? असा प्रश्न विचारला होता.
Who Is the Actor in ‘The Ajit Pawar’ Biopic
Who Is the Actor in ‘The Ajit Pawar’ BiopicSarkarnama
Published on
Updated on

'The Ajit Pawar’ biopic News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्याला आज आठ दिवस होत आहे. अजितदादांसोबतच्या आठवणी सोशल मीडिया व्हायरल होत असून अजितदादांचे कार्यकर्ते, नेते, निकटवर्तीय यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

एका मराठी चित्रवाहिनीच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अजितदादांची मुलाखत झाली होती. यातील या व्हिडिओ क्लिप आहे. यात अभिनेते अवधूत गुप्ते यांनी दादांना 'द अजित पवार' नावाचा बायोपिक आला तर यात तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला अजितदादांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले आहे.

यावर उत्तर देतात अजितदादा म्हणतात की, माझा रोल डॉ. निलेश साबळे यांनी करावा. त्यावर अभिनेता निलेश साबळे म्हणाला की, अजितदादांचा रोल मी किती चांगला करायचो हे माहिती नाही पण हे लोकांना आवडायचं. पण मला माहित नव्हतं की, अजितदादा स्वत:बघतात. पण, आता मला कळलं आहे त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे.

यावर अजित पवार म्हणतात, मी पण कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. त्यानंतर ठरवत असतो. आम्ही पण आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. पण आम्ही एकदा माईक हातात घेतल्यानंतर आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो,"

Who Is the Actor in ‘The Ajit Pawar’ Biopic
Tanaji Sawant Warns: माझा नाद नाय करायचा! थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो; तानाजी सावंतांचा बंडखोर उमेदवाराला दम

"निलेश साबळे यांनी बऱ्याचदा या ठिकाणी, या ठिकाणी म्हणत माझी नक्कल केली. तेव्हापासून मी ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल तेवढा कमी वापरायचा. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्याातून मलाही कळेल आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे," असे अजितदादांनी दिलखुलासपणे सांगितले. त्यानंतर उपस्थितामध्ये हास्याचे कारंजे उडाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com