Sharad Pawar On Beed Results : बीडमध्ये मतमोजणीवेळी तणाव, शिलेदार अडचणीत; पवारांनी ट्विट करत घातलं लक्ष

Beed Loksabha Election Result 2024 : शरद पवार यांनी ट्विटमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Beed News : बीड लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीची लढाई होत आहे.दोन्हीही उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावत बीड काबीज करण्यासाठी कुठलीही कसर सोडली नव्हती.

त्याचाच परिणाम म्हणून मुंडे आणि सोनावणे यांच्यात 32 व्या फेरीपर्यंत चुरस कायम राहिली. अगदी दोन ते अडीच हजारांवर मताधिक्य असल्याने फेरमोजणीपर्यंत गोष्टी कायम राहिल्या. यातच आता बीडमध्ये मतमोजणीदरम्यान,तणावाची निर्माण झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे.कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे असं आवाहन केले आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे.टीव्ही 9 पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार बीडमधून शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा होती.पण आजच्या निकालात मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यात विजयासाठी काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

Sharad Pawar
Lok sabha Nivadnuk nikal: रामभूमीने भाजपला नाकारलं, राजाभाऊ वाजे 1 लाख 61 हजार मतांनी विजयी!

बीडमधील मतमोजणीवेळी 21व्या फेरीपर्यंत बजरंग सोनवणे हे 34 हजार मतांनी पिछाडीवर होते. याच वेळी उमेदवार अशोक थोरात यांच्या पिपाणी चिन्हावर त्याहून अधिक मतदान झाले आहे. विशेष म्हणजे वंचितच्या अशोक हिंगे यांच्यापेक्षा अधिक मते अपक्षाला मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे आता निकाल काय, लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 41 उमेदवार आणि एक नोटा असे 42 उमेदवार झाले. त्यामुळे तीन मतदान यंत्र केंद्रांत बसवावे लागले. प्रमुख उमेदवार पंकजा मुंडे यांचे चिन्ह पहिल्या मशिनच्या पहिल्या क्रमांकावर होते. तर, बजरंग सोनवणे यांचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर होते. तर चौथ्या क्रमांकावर अशोक थोरात यांचे पिपाणी हे चिन्ह होते.

Sharad Pawar
Sharad Pawar: ऑल इज वेल...ऑल इज वेल: बारामतीच्या विजयातून शरद पवारांचा थेट संकेत

ग्रामीण भागात तुतारी व पिपाणी यात फरक कळला नसल्याचे दिसते. त्यामुळे पिपाणी चिन्हावरही भरभरुन मतदान झाल्याचे मतमोजणीच्या आकड्यांवरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे वंचितच्या अशोक हिंगे यांच्यापेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत. 22 व्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांचे लीड 38 हजारांचे झाले आहे.

बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) बजरंग सोनवणे यांच्यात अटातटीच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या दोन प्रमुख उमेदवारासोबतच वंचितकडून अशोक हिंगे रिंगणात होते. आता मतमोजणीत समोर येणाऱ्या आकडेवारी टेन्शन वाढविणारी ठरत आहे.

Sharad Pawar
Uddhav Thackeray On BJP : 'भूल चुका हूँ उन लोगों को जिनको गलती से चुन लिया था !' ठाकरेंनी फटकारले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com