Lok sabha Nivadnuk nikal: रामभूमीने भाजपला नाकारलं, राजाभाऊ वाजे 1 लाख 61 हजार मतांनी विजयी!

Nashik Lok Sabha Constituency: नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. तर महाविकास घाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
Rajabhau Waje Nashik Lok Sabha Winner
Rajabhau Waje Nashik Lok Sabha WinnerSarkarnama

Rajabhau Waje Nashik Lok Sabha Winner: नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. तर महाविकास घाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्या.

यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांना 6 लाख 14 हजार 517 (49.83 टक्के) इतकी मते मिळाली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना 4 लाख 53 हजार 414 (36.76 टक्के) मते मिळाली. वाजे यांनी गोडसे यांचा 1 लाख 61 हजार 103 एवढ्या मताधिक्याने पराभव केला आहे.

नाशिक (Nashik) मतदारसंघात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा गाजा वाजा भाजपने केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या (Election) तोंडावर नाशिकमधील श्री काळाराम मंदिरात पूजा केली, संकल्प सोडला, रोड शो केला. मात्र निवडणूक प्रचारात श्रीराम मंदिराचा मुद्दा भाजपने हिरीरीने मांडला होता. मात्र नाशिकच्या मतदारांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं मतदानातून दिसत आहे. कारण भाजपचा सहभाग असलेल्या महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना मतदारांनी नाकारलं आहे.

या निवडणुकीत मतदारांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात कौल दिला आहे. याला राज्यातील भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' या गोंडस नावाखाली उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेत पाडण्यात आलेली फुट हे एक प्रमुख कारण होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांना स्वतंत्र गट करून पक्षात फूट टाकण्यात आली. हे मुद्दे राज्यातील जनतेला रुचलं नसल्याचं लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झालं आहे.

Rajabhau Waje Nashik Lok Sabha Winner
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : नगरमध्ये विखेंना 33 वर्षांनी पवारांनी अद्दल घडवली!

खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार वाजे यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर दुसरे इच्छुक विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व घडामोडील शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य करण्यात आलं होतं. मतदारांना ही राजकीय तडजोड पसंत पडली नाही. त्यामुळे सर्व मतदारसंघातून वाजे यांना सुरुवातीपासून आघाडी होती ती शेवटच्या फेरीपर्यंत गोडसे यांना मोडता आली नाही.

तर मतदारसंघात बहुचर्चित आणि आध्यात्मिक क्षेत्रातील शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी विशेष चर्चेत होती. शांतिगिरी महाराजांमुळे मत विभागणी होऊन त्याचा फटका बसेल अशी भीती होती. मात्र शांतिगिरी महाराज कोणताही प्रभाव दाखवू शकले नाही त्यांना चौथ्या क्रमांकाची 44 हजार 415 मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना देखील 47 हजार 114 अशी एवढी मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com