Beed News: राज्य सरकारचा महत्वकांक्षी व जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील बहुचर्चित 'शासन आपल्या दारी' उपक्रम मंगळवारी परळीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने बीडमध्ये होणारा कार्यक्रम परळीत निश्चित झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून कार्यक्रमाची 'तारीख पे तारीख' अशी स्थिती होती. अखेर कार्यक्रम निश्चित झाला असून अख्ख्या जिल्ह्याचे प्रशासन तयारीसाठी परळीत तळ ठोकून आहे.
धनंजय मुंडे देखील नियोजनात लक्ष घालत असून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आदी अधिकारी परळीत थांबून आहेत. या कार्यक्रमादरम्यान परळीतील सिरसाळा एमआयडीसी, वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास, सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयांचे भूमिपूजन व बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमात 22 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परळीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार हे परळीत येत आहेत. पण या कार्यक्रमापूर्वी या तिघांसह प्रमुख नेते परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर जाऊन दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत.
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी परळीत येत असलेले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांच्या सत्कारासाठी 'खास हार' तयार करण्यात आले आहेत. या तिघांसह इतर पाहुण्यांचेही रेशीमच्या हारांनी स्वागत करण्यात येणार आहे.
परळीत मंगळवारी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल 597 कोटी रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजनं होणार आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुढाकाराने होत असलेल्या कार्यक्रमासाठी शिंदे, फडणवीस, पवार, राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री सामंत उपस्थिती असणार आहेत.
यानिमित्ताने सिरसाळा एमआयडीसी उभारणीचे भूमिपूजन, वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286 कोटी 68 लाख रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन, तालुक्यात कृषी विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या तीन शासकीय संस्था उभारणीच्या 311 कोटींच्या कामांचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 61 कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.