Ambadas Danve In Mumbai March : शिंदे-फडणवीस सरकार मुंबईच्या जनतेचा पैसा लुटत आहेत...

Shivsena : शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला.
Opposition Leader Ambadas Danve News,
Opposition Leader Ambadas Danve News,Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : आपल्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरला फायदा मिळावा या हेतूने सरकारमधील लोकांकडून लाखो कोटी रुपयांचे टेंडर काढले जात असल्याचा आरोप (Ambadas Danve In Mumbai March) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

Opposition Leader Ambadas Danve News,
Abdul Sattar Appeal News : शेतकऱ्यांनो शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको..

युवासेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावर शिंदे-फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचारी वृत्ती विरोधात शिवसेनेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. (Shivsena) यावेळी दानवे यांनी सरकारवर आरोप करत टीका केली.

लोकांच्या मालकीचे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील १२ हजार कोटी रुपयांचे डिपॉझिट सरकार रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली आपल्या जवळच्या बिल्डरांच्या घशाखाली घालत आहेत. (Mumbai) शिवसेनेच्या कार्यकाळात लोकांचा १२ हजार कोटी रुपये पैसा सुरक्षित होता.

Opposition Leader Ambadas Danve News,
Pankaja Munde News : भाजपची डबा पार्टी पंकजा मुंडेना गतवैभव मिळवून देणार का ?

परंतु गद्दार शिंदे गटाचे हे सरकार आल्यापासून मुंबईतील जनतेचा पैसा लुटला जात आहे. रस्ते दुरुस्ती व सौंदर्यीकरणाच्या मुंबईत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा देखील दानवे यांनी यावेळी केला.

मागील एका वर्षामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. जनतेच्या हजारो कोटी रुपयांची लूट केली जात आहे. सरकारमधील लोकांकडून आपल्या जवळच्या लोकांच्या फायद्यासाठी या पैशांचा वापर केला जात असल्याचेही दानवे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com