

Shivsena News : काही वर्ष मनसेमध्ये राज ठाकरेंसोबत काम केलेले प्रकाश महाजन सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. नुकताच त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांवर निशाणा साधला. विशेषतः राज ठाकरेंवर ते चांगलेच घसरल्याचे पहायला मिळाले.
राज ठाकरे हे कसले लोकनेते? कुत्र्याला सर्दी झाली म्हणून ज्यांनी मराठवाड्याचा दुष्काळी दौरा रद्द केला, मासा मेल्याचे सुतूक पाळले ते कधीही लोकनेते होऊ शकत नाहीत, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर टीका केली. कन्नड तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा पार पडली.
प्रकाश महाजनही या सभेत हजर होते. यावेळी त्यांनी केलेले भाषण आणि त्यातून राज ठाकरेंवर केलेली टीका याची सर्वत्र चर्चा होत आहे. मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले. त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाहीत.
राज-उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच महाजन यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करतांना त्यांच्यामध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची छबी दिसत असल्याचे म्हटले. गोपीनाथ मुंडे देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे उशिरा यायचे. एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकनेता म्हणून पाहू शकतो. लोकनेता शिंदे यांच्यासारखा असावा. पहिल्यांदा माझी भेट रात्री 1 वाजता झाली, म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो असे प्रकाश महाजन यांनी सांगीतले.
प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मी राज ठाकरेंना घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी मनसेच्या प्रवक्तेपणाचा राजीनामा दिला होता. माझं वय वाढलं आहे, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा कोणावर राग नाही असे त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.