PCMC Mayor: मोठी बातमी: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला; भाजपनं तगडा राजकीय अनुभव असलेल्या नेत्याला दिली संधी

PCMC Mayor Election News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली. दोन्ही बाजूने पिंपरी चिंचवडच्या महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. राज्यात महायुतीत एकत्र असतानाही पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला.
PCMC  Ravi Landge Mahesh Landge
PCMC Ravi Landge Mahesh Landge Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News: पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. या दोन्ही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवारांच्या अशा दोन्ही पक्षांनी एकत्र येऊनही राष्ट्रवादीला म्हणावं तेवढ यश मिळू शकलं नाही. आता अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा निर्णय घेताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रवी लांडगेंची यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाची निवड शुक्रवारी (ता. 6) केली जाणार आहे. पण सोमवारी महापौर पदासाठी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार रिंगणात न उतरवल्यामुळे भाजपच्या रवी लांडगेंच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर तब्बल चार वर्षांनंतर महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.

भाजप हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपच्या महापालिकेतील दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्या महापौरपदाची माळ ही रवी लांडगे यांच्या गळ्यात पडली. लांडगे हे सलग दोनवेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर भाजपकडून उपमहापौरपदी शीतल उर्फ विजय शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 37, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 6 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले आहेत..त्यामुळे एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपला महापौरपदाच्या निवडणुकीत फार काही संघर्ष करावा लागला नसल्याचं पाहायला मिळालं.

PCMC  Ravi Landge Mahesh Landge
Ajit Pawar NCP: अजितदादांचं अपघाती निधन, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या; घेतला मोठा निर्णय

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यामहापौरपदाची सोडत निघाली आहे. यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण खुला गट वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या 84 विजयी नगरसेवकांपैकी महिला किंवा पुरुष नगरसेवकाला महापौरपद मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील वादामुळे राज्यभरात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक प्रचंड गाजली होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली. दोन्ही बाजूने पिंपरी चिंचवडच्या महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. राज्यात महायुतीत एकत्र असतानाही पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. पण भाजपनं आपली पूर्ण ताकद लावत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत सत्ता मिळवली. त्यानंतर महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

PCMC  Ravi Landge Mahesh Landge
Chandrashekhar Bawankule : 'पक्षाशी बेईमानी, म्हणजे आईशी बेईमानी'; उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना घरी पाठवणार! बावनकुळेंनी दम भरला

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी भाजपनं या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेत निवडणूक लढवली. पण पुणे,पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यातही राष्ट्रवादीला मोठं यश मिळवता आलं नाही.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी निवडणुकीच्या तोंडावर रवी लांडगेंचा भाजपप्रवेश घडवून आणला होता. त्यावेळी भाजपनं रवी लांडगेंना मोठा शब्द दिल्याचीही चर्चा होती. तसेच त्यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर होते. रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांना पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा तगडा अनुभव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com