Chandrakant Khaire: विरोधक काहीही म्हणोत,राऊत आमची मुलूखमैदानी तोफच! खैरे म्हणाले, ते भाजपला पूरून उरले

Chandrakant Khaire News : विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊत यांचे समर्थन केले असून, भाजप व मोदी-शहा यांच्या राजकारणाला तोंड देणारी शिवसेनेची ताकद तेच असल्याचे सांगितले.
Sanjay Raut, Chandrakant Khaire News
Sanjay Raut, Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : संजय राऊत यांनी पक्ष बुडवला, शिवसेना फुटीला तेच जबाबदार आहेत, दिल्लीत ते शरद पवारांचे हस्तक म्हणून काम करतात, असे एक नाही अनेक आरोप सातत्याने त्यांच्यावर केले जातात. संजय राऊत यांच्यावर आरोप करतच शिवसेनेतील बरेच मंत्री, आमदार त्यावेळी पक्षातून फुटून बाहेर गेले. असे असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील सध्याच्या बहुतांश नेत्यांना संजय राऊत यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.

विरोधक काहीही म्हणू द्या, संजय राऊत ही आमची मुलूखमैदानी तोफ आहे. शिवसेना फोडणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना तसेच केंद्रातील मोदी-शहा यांच्या राजकारणाला ते पूरून उरले आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊत यांच्या कामाची प्रशंसा केली. उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील प्रत्येक नेता, आमदार, खासदार व सामान्य शिवसैनिकांना संजय राऊत यांच्या कामाबद्दल अभिमान असल्याचेही खैरे म्हणाले.

'सकाळ थेट भेट' मध्ये चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत पडलेली फूट ते मतचोरी वरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले. संजय राऊत यांनी पक्ष बुडवला, तेच उद्धव ठाकरे यांचे कान भरतात. त्यांचा पहाटेचा भोंगा बंद करा, ते राहिलेला पक्षही बुडवतील, अशा प्रकारचे आरोप आणि टीका एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून वांरवार केली जाते. शिवसेना फुटीला देखील संजय राऊत यांनाच जबाबदार ठरवतविरोधक त्यांच्यावर टीका करतात.

उद्धव ठाकरे आणि पक्षातील इतर सर्वच नेते मात्र संजय राऊत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यामुळेच शिवसेनेची ताकद आणि दरारा टिकून असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या मोदी-शहा जोडीला अंगावर घेतल्याचे म्हटले. ईडी, सीबीआयचा ससेमिरा, खोट्या चौकशा, जेलमध्ये जावे लागले तरी संजय राऊत डगमगले नाहीत. भाजपच्या कपडी राजकारणाला ते पुरून उरले आहेत.

Sanjay Raut, Chandrakant Khaire News
Sanjay Raut : 'कितीही आपटली तरी काँग्रेसच्या भूमिकेला...'; वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून संजय राऊतांचा वडेट्टीवारांसह बावनकुळेंवर हल्लाबोल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या संजय राऊत यांचा आक्रमकपणा हीच शिवसेनेची ओळख आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, पक्ष फोडला अशा संकटात राऊत यांनी त्यांना धीर दिला, एवढेच नाही तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांनी जशासतसे उत्तर दिले. कपडी राजकारण, भ्रष्टाचार, देशातील महागाई, दहशतवाद, विदेश निती अशा सगळ्याच आघाड्यांवर संजय राऊत यांनी वारंवार मोदी-शहा आणि राज्याती महायुती सरकारचे वाभाडे काढले आहे.

Sanjay Raut, Chandrakant Khaire News
Maharashtra Assembly: 'शिंदे सेना' उल्लेखावरुन विधानसभेत गदारोळ! शंभुराज देसाईंनी घेतला आक्षेप

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील प्रत्येक नेता, पदाधिकारी, शिवसैनिकांचा संजय राऊत यांच्यावर विश्वास आहे. विरोधकांचे सगळे गैरप्रकार, भ्रष्टाचार यावर आपल्या लेखणीतून हल्ला चढवणारे राऊत हे प्रत्यक्ष मैदानातही त्यांना मात देत आहेत. त्यामुळे त्यांच्या निशाण्यावर ते असणे सहाजिक आहे. परंतु संजय राऊत ही शिवसेनेचे ताकद आहे. सध्या प्रकृतीमुळे ते राजकारणापासून काही काळासाठी लांब असले तरी विरोधकांचा समाचार घेणे त्यांनी थांबवलेले नाही, ही आमच्यासाठी जमेची बाजू असल्याचे खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com