Maharashtra Assembly: 'शिंदे सेना' उल्लेखावरुन विधानसभेत गदारोळ! शंभुराज देसाईंनी घेतला आक्षेप

Shiv Sena Dispute : विधानसभेत 'शिंदे सेना' असा उल्लेख केल्याने शंभुराज देसाई यांनी आक्षेप नोंदवला, आक्षेपानंतर हा शब्द कामकाजातून वगळण्यात आला, ज्यामुळे शिवसेना वाद पुन्हा चर्चेत आला.
Varun Sardesai, shambhuraj Desai
Varun Sardesai, shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Assembly Session : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे सेना उद्धव सेना असे दोन गट निर्माण झाले होते आणि आपणच मूळ शिवसेना असल्याचा वळोवेळी हे दोन गट दावा करत आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण सोपवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. असे असले तरी उद्धव ठाकरे यांच्या आमदारांमार्फत शिंदे सेना असाच उल्लेख केला जात आहे. या उल्लेखावर आज विधानसभेत आक्षेप घेण्यात आला. शिंदे सेना हा उल्लेख कामकाजातून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असा उल्लेख कोणी करू नये अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने केली.

विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी कामकाजाच्या दरम्यान शिंदे सेना असा उल्लेख केला. त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. आम्हाला निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतपणे मूळ शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच पक्ष चिन्ह धनुष्यबाणसुद्धा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. त्यामुळे वारंवार शिंदे सेना असा उल्लेख कोणी करू नये.

Varun Sardesai, shambhuraj Desai
MLA Mahesh Landge : पुण्यात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने, 'कॉस्मेटिक जिहादचा' नवा पिंपरी चिंचवड पॅटर्न ? नागपूर अधिवेशनात मोठी चर्चा

अशी मागणी मंत्री शंभुराज देसाई शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी केली. आम्ही आमच्या पक्षासमोर (शिवसेना उबाठा) असा उल्लेख करीत नाही, शिवसेना असाच करतो. त्यामुळे आमदार वरुण सरदेसाई यांनी शिंदे सेना असा केलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकावा अशी मागणी शंभुराज देसाई यांनी केली.

Varun Sardesai, shambhuraj Desai
Tukaram Munde: तुकाराम मुंढेंचे निंलबन होणार? अधिवेशनात उदय सामतांचे स्पष्टीकरण; आरोपात तथ्य आहे का?

यानंतर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या आमदारानेसुद्धा अजित दादा गट असा उल्लेख करू नये. अशी सूचना केली. वरुण सरदेसाई यांनी मात्र याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांना विधानसभेत आपला प्रश्न रेटला. त्यामुळे पुढील संघर्ष टळला. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) मोजकेच सदस्य विधानसभेत उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com