Shivsena : बाळासाहेबांच्या सभांनी इतिहास निर्माण केला, इतर कुणाला ते जमणार नाही..

औरंगाबाद आणि मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि कायम राहिल. ( Shivsena)
Ambadas Danve-Raj Thackeray
Ambadas Danve-Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. (MNS) मुंबईतील गुडीपाडवा मेळावा, त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा आणि आता औरंगाबादेत सभा घेत राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वाचा जागर करणार आहेत. या सभेची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः शिवसेनेकडून (Shivsena) या संदर्भात प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यानंतर जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी देखील राज ठाकरेंच्या सभेने शिवसेनेला काडीचाही फरक पडणार नाही असे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या १ मे च्या सभे संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे म्हणाले, औरंगाबादच नव्हे तर संपुर्ण मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कायमच राहील.

शिवसेनाप्रमुख हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर लाखांच्यावर गर्दीच्या अनेक सभा झाल्या, या सभांनी मराठवाड्यात, राज्यात एक इतिहास निर्माण केला होता. तसा इतिहास इतर कुणाला जमणे शक्यच नाही. त्यामुळे शहरात येऊन कुणीही सभा घेतली तरी त्याने शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. औरंगाबाद आणि मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि कायम राहिल, असा दावा देखील दानवे यांनी केला.

Ambadas Danve-Raj Thackeray
Shivsena : राज ठाकरेंना ऐकायला लोक येतात, पण मत देत नाहीत..

तत्पुर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला लोक येतात, पण त्यांना मत देत नाहीत, असा टोला लगावला होता. बाळासाहेबांसारखी भगवी शाल अंगावर घेऊन किंवा त्यांच्या सारखा पेहराव करून कुणी बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही, असेही खैरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com