Sandipan Bhumre: शिवसेना-भाजपकडं आता कार्यकर्ते फोडण्याचं नवं टार्गेट? संदीपान भुमरेंचा सूचक इशारा

Sandipan Bhumre Latest Statement : शिवसेना-भाजपने महापालिका निवडणुकीआधी एकमेकांचे कार्यकर्ते न फोडण्याचा निर्णय घेतला असून विरोधकांच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यावर भर देणार असल्याचे संकेत संदीपान भुमरेंनी दिले.
Shivsena MP Sandipan Bhumre
Shivsena MP Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Sandipan Bhumre Latest Statement : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप या सत्तेतील दोन्ही पक्षांनी एकमेकांचेच पदाधिकारी, कार्यकर्ते पळवले होते. हे प्रकार इतके वाढले की एकनाथ शिंदे यांना थेट दिल्ली गाठून अमित शहांकडे दाद मागावी लागली होती. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही आणि हे प्रकार त्यानंतरही सुरूच होते. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय फडणवीस-शिंदे यांनी घेतल्यानंतर आता शिवसेना-भाजप एकमेकांच्या कार्यकर्त्यांना फोडणार नाही, असे ठरल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी या संदर्भात मोठे भाष्य केले आहे. शिवसेना-भाजप आता एक-दुसऱ्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडणार नाहीत पण विरोधकांचे मात्र फोडू असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सूचक इशारा केला. महापालिका निवडणुकीतील इच्छुकांना अर्ज वाटपाला आज शिवसेनेच्या संपर्क कार्यालयातून सुरूवात झाली. संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश जैस्वाल, माजी महापौरांच्या उपस्थितीत अर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

तत्पूर्वी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश जैस्वाल यांच्यासह संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिका निवडणुकी संदर्भात महत्वाचे निर्णय घेतले. शिरसाट-जंजाळ यांच्या वादावरही याच बैठकीत पडदा टाकण्यात आला. त्यानंतर आज माध्यमांनी पक्षांतर्गत वाद मिटला का? असा प्रश्न भुमरे यांना विचारला. त्यावर आमच्या पक्षात कुठलाही वाद नाही, अर्ज वाटपासाठी झालेली गर्दी पाहा, असं ते म्हणाले.

Shivsena MP Sandipan Bhumre
Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा; म्हणाले,'भाजपकडून माझंही घर फोडण्याचा प्रयत्न, मुलाला पक्षप्रवेशाची ऑफर...

महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप (BJP) एकत्र लढणार आहे. त्यामुळे एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी फोडण्याचे प्रकार आता होणार नाही. पण विरोधकांचे कार्यकर्ते आम्ही निश्चितच फोडू, मला काय म्हणायचे आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, असा चिमटा भुमरे यांनी काढला. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे, एका प्रभागात दहा इच्छूक आहेत, यातून होणारी बंडखोरी कशी रोखणार? असा प्रश्न त्यांना केला.

यावर इच्छूक अधिक आहे हे जरी खरे असले तरी प्रत्येकाला आपण न्याय देऊ शकत नाही. आम्ही मुलाखतीतून काही नावे निश्चित करू, त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्यावर ती आम्हाला मान्य असेल. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होणाऱ्यांना आम्ही कुठेतरी सामावून घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे पक्षात बंडखोरी होणार नाही, असा दावाही भुमरे यांनी यावेळी केला.

Shivsena MP Sandipan Bhumre
Chandrakant Khaire: ...म्हणून एकनाथ शिंदेंना गोंजरणं सुरू; चंद्रकांत खैरेंनी भाजपला डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com