Dasara Melava 2023 : बाळासाहेब म्हणायचे, 'या' ठिणग्या गावागावांत उडवा...

Shivaji Park Shivsena Dasara Melava 2023 :ज्योत हाती घेतल्यानंतर बाळासाहेबांचे हे वाक्य कानावर पडायचे. त्याची आठवण आली की अजूनही अंगावर शहारे येतात...
Shivsena Dasara Melava
Shivsena Dasara MelavaSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group Dasara Melava : "येथे मिळालेल्या विचारांच्या ठिणग्या तुमच्या मतदारसंघात जाऊन पेटवा, काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्मिती करा.." दसरा मेळाव्याला मराठवाड्यासह ग्रामीण भागातून येणाऱ्या या अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा संदेश द्यायचे. त्याचा परिणाम दिसून आला. शिवसेनेला मुंबईतच रोखू, अशा वल्गना विरोधकांकडून केल्या जायच्या. बाळासाहेबांच्या विचारांच्या बळावर सामान्य शिवसैनिकांनी त्या वल्गनांना जागा दाखवून दिली आणि शिवसेना मराठवाड्याच्या गावोगावी पोहोचली आणि रुजलीही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांच्या शब्दांत जादू असायची...

विद्यार्थीदशेपासून शिवसेनेत कार्यरत असलेले आणि आता शिंदे गटात असलेले धाराशिव येथील अनिल खोचरे तुळजाभवानी मातेची ज्योत घेऊन दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ गाठायचे. थेट व्यासपीठावर जाऊन ती ज्योत ते बाळासाहेबांच्या हाती द्यायचे. येथे मिळालेल्या विचारांच्या ठिणग्या तुमच्या मतदारसंघात जाऊन पेटवा, ज्योत हाती घेतल्यानंतर बाळासाहेबांचे हे वाक्य कानावर पडायचे. त्याची आठवण आली की अजूनही अंगावर शहारे येतात, असे अनिल खोचरे सांगतात. ते पुढे म्हणतात, बाळासाहेबांच्या शब्दांत जादू असायची. त्यांनी एकदा आदेश दिला की आम्ही झोकून देऊन कामाला लागायचो. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी असा संदेश दिला होता. आम्ही परत येऊन कामाला लागत असू. त्याचा परिणाम धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात दिसून आला. धाराशिव जिल्हा तर शिवसेनेचा बालेकिल्लाच बनला.

Shivsena Dasara Melava
Balasaheb Thackeray On Congress: हिजडे, नालायक, शेळपट अशा शब्दांनी घायाळ करणारे बाळासाहेब

शिवसेना फुटली अन् दोन मेळावे सुरू

आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यांच्या मागे उद्धव ठकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवली आहे. असे असले कार्यकर्त्यांसह सर्वांनाच बाळासाहेबांची उणीव भासते. शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले. त्याची कारणे काहीही असली सामान्य शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी हळहळला होता. मुंबईत शिवसेना आवश्यक आहे, अशी भावना शिवसेनेच्या विचासरणीला विरोध करणाऱ्या या नागरिकांमध्येही काही प्रमाणात दिसून येते. शिवसेना फुटली आणि दोन दसरा मेळावे सुरू झाले. एक उद्धव ठाकरे यांचा, दुसरा एकनाथ शिंदे यांचा.

सामान्यांना विधानसभेत पाठवले

दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या अनिल खोचरे यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेनेने मराठवाड्यात हातपाय पसरले. बाळासाहेबांच्या विचारांच्या बळावर लोकांनी शिवसेनेच्या अगदी सामान्य उमेदवारांना विधानसभेत पाठवले. परंड्याचे ज्ञानेश्वर पाटील हे त्याचे बोलके उदाहरण. पाटील हे काळीपिवळी जीप चालवायचे. बाळासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि भूम-परंडा मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार झाले.

सामान्य गृहिणी नरहिरे आमदार, खासदार झाल्या..

सामान्य गृहिणी असलेल्या कळंब येथील कल्पनाताई नरहिरे आमदार झाल्या, नंतर खासदारही झाल्या. शिवाजीबापू कांबळे हेही खासदार झाले. उमरगा येथील महाविद्यालयात प्राध्यापक असलेले रवींद्र गायकवाड हे प्रस्थापित राजकीय नेत्यांना मात देत दोनदा आमदार आणि एकदा खासदार झाले. त्याच महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक असलेले ज्ञानराज चौगुले हे आता उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. पहिल्या निवडणुकीत मतदारांनी चौगुले यांच्यासाठी आर्थिक मदतही गोळा केली होती.

Shivsena Dasara Melava
Balasaheb Thackeray On BJP: जेव्हा बाळासाहेबांनी भाजपला म्हटलं...'रक्त पिणारी कमळाबाई'

राजकारण करायचे तर शिवसेनेतच..

बाळासाहेब आणि शिवसेनेची जादू अशी होती की पक्षाने दोनदा बाहेर काढल्यानंतरही प्रा. रवींद्र गायकवाड यांनी संधी असूनही अन्य पक्षांत प्रवेश केला नाही. राजकारण करायचे तर शिवसेनेतच, अन्यथा नाही, अशी त्यांची भूमिका आहे. अशी निष्ठा शिवसैनिकांतच दिसून यायची.मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांनीही शिवसेनेला भरभरून दिले आहे. हे सर्व शक्य झाले ते बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिणग्यांमुळे. त्यांच्या विचारांच्या ठिणग्या असंख्य कार्यकर्त्यांनी गावागावांत पेटवल्या होत्या.

Shivsena Dasara Melava
Balasaheb Thackeray Last Speech : थरथरत्या आवाजातच बाळासाहेबांनी घातली साद; माझ्या उद्धव, आदित्याला सांभाळा !

सच्च्या शिवसैनिकांच्या वेदना...

काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या सरंजामी धाटणीच्या राजकारणामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या राजकारणातील संधीच्या वाटा बंद झाल्या होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही कोंडी फोडत सरंजामशाहीला कंटाळलेल्या नागरिकांना पर्याय उपलब्ध करून दिला. आमदार, खासदार कुठेही भेटू शकतात, त्यांना कुणीही बोलू शकतो याची प्रचीती बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांच्या शिलेदारांनी आणून दिली. त्याच बळावर शिवसेना गावागावांत पोहोचली. आज त्याच शिवसेनेची दोन शकले झाली आहे. त्याच्या वेदना सच्च्या शिवसैनिकांच्या बोलण्यातून जाणवतात.

Edited By : Mangesh Mahale

Shivsena Dasara Melava
Balasaheb Thackeray On Sharad Pawar: मैद्याचं पोतं, म्हमद्या अन् शरद पवार...मैत्रीचं अनोखं नातं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com