MLA Disqualification Case : '...म्हणून निकाल आमच्या बाजूनेच लागेल' : अपात्रतेच्या निकालापूर्वीच सत्तारांचा दावा

Abdul Sattar On MLA Disqualification Case : ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यातील तिसऱ्या क्रमांकावर अब्दुल सत्तार आहेत.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूंनी निकाल आमच्या बाजूनेच लागणार, विजय सत्याचाच होणार, असे दावे-प्रतिदावे करीत आहेत.

यातच ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यातील तिसऱ्या क्रमांकावर नाव असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र शिवसेना नाव, पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आमच्याकडेच असल्यामुळे निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abdul Sattar
MLA Disqualification Result: निकालाआधीच नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, 'निकालातून सर्वांना...'

ठाकरे गटाकडून होणाऱ्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले. ठाकरे गटाकडे जळणारी मशाल, तर आमच्याकडे रामाचा धनुष्यबाण आहे. या बाणाने आम्ही आता बघा काय करतो ? असा इशाराही सत्तार यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेच्या निकालाचा क्षण अवघ्या काही तासांवर आलेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घेतलेली विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट ही यामुळे वादात सापडली आहे. उद्धव ठाकरे यांनी या भेटीवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली, तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदेंनी विधानसभाध्यक्षांची भेट घेतली असेल तर त्यात वावगे काय ? मुख्यमंत्री म्हणून ते अशी भेट घेऊ शकतात. त्यांनी राज्याच्या प्रश्नावरच त्यांची भेट घेतली असेल, असेही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राहुल नार्वेकर हे न्यायाला आणि संविधानाला धरून निकाल देतील. तो कुणाच्याही बाजूने असला तरी आम्हाला मान्य असेल, असेही सत्तार यांनी म्हटले आहे. जर निकाल आमच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरेंच्या गटाचे आमदार काय निर्णय घेतात, हेही तुम्हाला दिसेल.

आमदार अपात्रतेच्या 16 जणांच्या यादीमध्ये मराठवाड्यातील ज्या सहा आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे, त्यात तिसऱ्या क्रमांकावर अब्दुल सत्तार यांचे नाव आहे. त्यामुळे आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सत्तार काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. परंतु सत्तार यांनी आत्मविश्वासाने निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला आहे.

Edited By- Ganesh Thombare

R...

Abdul Sattar
MLA Disqualification Case: अपात्रता प्रकरणाच्या निकालापूर्वी राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, 'मॅच फिक्सिंग...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com