औरंगाबाद : शिवसेना आमदाराने कुटुंबीयांसोबत मिळून भावजयीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात घडली होती. या प्रकरणी शिवसेना (Shivsena) आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता याच आमदाराच्या भावाने आणि पुतण्याने एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामुळे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार रमेश बोरनारे यांचा भाऊ आणि पुतण्यावर या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार बोरनारे यांनी भावजयीला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आमदार बोरनारे यांच्या भावासह पुतण्याचा हा प्रताप उघडकीस आला आहे. शेतीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. बोरनारे यांच्या बांधाला बांध असलेल्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. तसेच, तिला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
दरम्यान, बोरनारे यांनी भावजयीला मारहाण केल्याप्रकरणी नुकताच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सटाणा येथे भाजपच्या शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी झाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलतभावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे ही पतीसह उपस्थित होत्या. त्यावेळी जयश्री बोरनारे यांनी डॉ. कराड व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. मात्र, हा सत्कार आमदार बोरनारे यांच्या कुटुंबीयांना सहन झाला नाही.
जयश्री बोरनारे पतीसोबत गोदावरी कॉलनीत एका नातेवाईकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात गेल्या होत्या. या भर कार्यक्रमातच आमदार बोरनारे कुटुंबीयांनी जयश्री आणि त्यांच्या पतीलाही जबर मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही पोलीस ठाणे गाठले. आमदार बोरनारे कुटुंबीयांच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आमदार रमेश बोरनारे, त्यांचा भाऊ संजय बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य बोरनारे, रणजीत चव्हाण, संपत बोरनारे, अबोली बोरनारे, वर्षा बोरनारे, संगिता बोरनारे व दिनेश बोरनारे या दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.