

Shivsena News : राज्यात महायुती असताना भाजपाकडून मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून नेहमीच केला जातो. नंबर एकचा पक्ष होण्याच्या इर्षेतूनच महापालिका, जिल्हा परिषदेत हे तीनही मित्रपक्ष स्वतंत्र लढल्याचे दिसून आले होते.
विधान परिषदेच्या सतरा जागांमध्ये एक एक जागा मिळवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीला संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मराठवाडा दौरा हा आगामी काळातील स्वबळाच्या चाचपणीसाठीच असल्याची चर्चा होत आहे.
जालना येथील शिवसंवाद मेळाव्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, युती होईल की नाही? हे नेते ठरवतील. तुम्ही मात्र प्रत्येक सर्कलमध्ये उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी करा, असा सूचक संदेश श्रीकांत शिंदे यांनी दिला. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाही वाचला. महायुतीतील भाजप पक्षाने मुख्यमंत्री पाणंद रस्ते समितीसह इतर तालुकास्तरीय समित्यांवर केवळ त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे.
पक्षाने देखील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पक्षाला सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याची गरज असल्याचा घरचा आहेर काही कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना श्रीकांत शिंदे यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. युती होईल की नाही? हे वरिष्ठ नेते ठरवतील पण प्रत्येक सर्कलमध्ये आपला स्वतंत्र उमेदवार उभा राहील, अशा पद्धतीने काम करा, असे शिंदे म्हणाले.
शिवसंवाद बैठकीत काही खोतकर समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे त्यांना मंत्री करण्याची मागणी केली. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अभिमन्यू खोतकर यांना उमेदवारी मिळणार का? या प्रश्नावर याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अभिमन्यू खोतकर यांचे काम चांगले आहे, त्यांनी युवासेना जिल्ह्यात वाढवली आहे. एकनाथ शिंदे यांचे पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष असते, असे सांगत उमेदवारीचा चेंडू टोलवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.